नवीन सैनिक शाळा उभारण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – भागीदारी पद्धतीत 100 नवीन सैनिक शाळा उभारण्याच्या सरकारच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाची सैनिक स्कूल सोसायटी, पात्र इच्छुकांना  नोंदणी करण्यासाठी आवाहन केले गेले आहे. अर्ज करण्यासाठी आपले  पोर्टल   https://sainikschool.ncog.gov.in/   27 सप्टेंबर 2023 पासून पुन्हा खुले झाले आहे. ते 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत खुले राहील. नवीन सैनिक शाळा उभारण्यासाठी  इच्छुक शाळा/ट्रस्ट /बिगर सरकारी संस्था  इत्यादींनी  पोर्टलवर उपलब्ध असलेल्या गुणात्मक आवश्यकता, करारनामा आणि नियम व नियमनांचा अभ्यास करावा.

ज्या शाळा/बिगर सरकारी संस्था /ट्रस्ट/सोसायटी इत्यादींनी  आधीच नोंदणी केली आहे आणि फेरी-1 व  फेरी-2 दरम्यान अर्ज केला आहे त्यांना नव्याने अर्ज करण्याची किंवा पुन्हा नोंदणी शुल्क भरण्याची गरज नाही.  पूर्वी नोंदणी केलेल्या  अर्जदारांना पोर्टलवर त्यांची माहिती  नव्या माहितीसह  अद्ययावत करावयाची असल्यास त्यासाठी परवानगी असेल.

अधिक  स्पष्टीकरणासाठी/साहाय्यासाठी, इच्छुक शाळा  sainikschoolaffiliation@gmail.com   वर ईमेल पाठवू शकतात.

नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याचे सरकारचे ध्येय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना देणे आणि त्यांना सशस्त्र दलातील संधींसह इतर उत्तम करिअरच्या संधी पुरवण्यापुरतेच मर्यादित नसून  राज्य सरकारे/बिगर सरकारी संस्था /खाजगी क्षेत्र यांना केंद्र सरकारसोबत  राष्ट्र उभारणीसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हेही आहे. या दिशेने, सैनिक स्कूल सोसायटीने 42 खाजगी/बिगर सरकारी संस्था /राज्य सरकारी शाळांना नवीन सैनिक शाळा म्हणून मान्यता दिली आहे. या 42 शाळा, पूर्वीच्या पद्धतीनुसार कार्यरत असलेल्या विद्यमान 33 सैनिक शाळांव्यतिरिक्त आहेत.

या नवीन शाळा, संबंधित शिक्षण मंडळांच्या संलग्नतेव्यतिरिक्त, सैनिक स्कूल सोसायटीअंतर्गत कार्यरत राहतील  आणि भागीदारी पद्धतीने नवीन सैनिक शाळांसाठी नियम व नियमनांचे  पालन करतील. याशिवाय, त्यांच्या नियमित संलग्न शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासोबत, ते सैनिक स्कूल पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना अकॅडेमिक  प्लस अभ्यासक्रमाचे शिक्षणदेखील देतील.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web