मुंबईत खादी आणि ग्रामोद्योग उत्सव- २०२३चे उदघाटन

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी मुंबईतील खादी आणि ग्रामोद्योग मुख्यालयात खादी महोत्सव-23 या प्रदर्शनाचे उदघाटन, खादी  आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनित कुमार, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले. खादी महोत्सव-23 हा उत्सव 27 जानेवारी ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मुंबईत साजरा होत आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष मनोज कुमार याप्रसंगी म्हणाले, की पंतप्रधान   मोदी यांनी देशातील जनतेला खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांची विक्री अपेक्षापेक्षा अधिक वाढली आहे. अध्यक्षांनी यावेळी पंतप्रधानांच्या “वोकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल” चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन, सर्वांना केले. अध्यक्षांनी केव्हीआयसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या प्रगतीची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रेरित केले. नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत झालेल्या अतुलनीय भारत पर्यटन महोत्सव (आयआयटीएफ,IITF)-2022 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 12 कोटी रुपयांची विक्री हे याचे प्रत्यक्षातील उदाहरण आहे. यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी खादी इंडियाच्या दिल्लीतील दुकानाने पुन्हा एकदा एका दिवसात 1.34 कोटी रुपयांच्या खादी विक्रीचा सर्वकालीन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षी खादी आणि ग्रामोद्योगच्या वस्तूंची एक लाख पंधरा हजार कोटींची विक्रमी विक्री झाली होती, या गोष्टीचाउल्लेख करणे अभिमानास्पद आहे.  पुढेही,3 ऑक्टोबर पासून आयोजित झालेल्या महिन्यात खादी फेस्ट-2022 मध्ये 3.03 कोटी रुपयांच्या विक्रीची नोंद झाली होती, असेही ते म्हणाले. सर्वांनी खादी फेस्टला व्यापक प्रसिद्धी देण्याचे सांगून देशातील गरीब विणकर, महिला आणि कसबी कारागीर यांच्या सन्माननीय कमाईसाठी खादी आणि ग्रामोद्योगच्या वस्तू खरेदी करा, असे आवाहन केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी केले.त्यां नी पद्मश्री आणि संत कबीर पुरस्कार विजेत्या नागालँडमधील खादी विणकर श्रीमती नेहनुओ सोरी आणि केरळमधील पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ खादीतज्ञ व्ही पी प्पुकुट्टन पोडुवाल यांचे अभिनंदन केले. या खादी महोत्सवात खादी आणि ग्रामोद्योग संस्था, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाशी संलग्न देशाच्या विविध भागातील पीएमईजीपी युनिट्स त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी  सज्ज झाले आहेत.सुती खादी व्यतिरिक्त, खादी सिल्क, पश्मिना, पॉली वस्त्र, पटोला सिल्क, कलमकारी साड्या, कांजीवरम सिल्क, हलक्या वजनाच्या रेशमी मऊ सिल्क साड्या, टसर सिल्क, फुलकारी ड्रेस मटेरियल आणि खादीच्या कापडापासून बनवलेले इतर आकर्षक पोशाख, मधुबनी प्रिंट्स, सुका मेवा, चहा, काहवा, वनौषधीयुक्त सौंदर्य प्रसाधने ब्युटी आणि आयुर्वेदिक उत्पादने, मध उत्पादने, हाताने कागदाची उत्पादने, गृह सजावटीची उत्पादने, बांबू उत्पादने,चटया, कोरफडीची उत्पादने, चामड्याची उत्पादने तसेच इतर अनेक खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने उपलब्ध आहेत. राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल-…

राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल…

भारतीय मानक ब्युरोने दीड कोटी पेक्षा जास्त किमतीचे बनावट हॉलमार्क सोने केले जप्त

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी – भारतीय मानक ब्युरोने (BIS,बीआयएस ब्युरो) सोन्याच्या दागिन्यांवरील बीआयएस चिन्हाचा (BIS,…

राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

नेशन न्यूज मराठी टीम. दावोस/प्रतिनिधी – स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत…

‘महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचा’ प्रारंभ

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात मदत करणे, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट

नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी…

व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाला ३० जानेवारी पर्यंत मुदतवाढ

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. केंद्रीय कोळसा मंत्रालयाने 141 कोळसा खाणींसाठी 3 नोव्हेंबर 2022 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाची सहावी फेरी आणि त्यासाठीच्या दुसऱ्या प्रयत्नाला सुरू केली होती. उद्योग क्षेत्राकडून असलेली कोळशाची मागणी लक्षात घेऊन तसेच व्यवसाय सुलभतेला चालना देण्याच्या दृष्टीने मंत्रालयाने यापुढे, परफॉर्मन्स बँक गॅरंटीसाठीची पहिली तपासणी उजळणी ही, संबंधीत खाणी खुल्या करण्याची परवानगी दिल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आता निविदेशी निगडीत कागदपत्रांमधील तरतुदींनुसार, यशस्वीरित्या लिलाव झालेल्या प्रत्येक कोळसा खाणीसाठी, सादर कराव्या लागणाऱ्या परफॉर्मन्स बँक गॅरंटीमध्ये, दरवर्षी त्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिल महिन्यात राष्ट्रीय कोळसा निर्देशांकाच्या आधारे तपासणी करून सुधारणा केली जाणार आहे.  2020 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणींसाठी पहिला लिलाव सुरू झाल्यापासून, राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांत दुप्पटीने वाढ झाली आहे, ही बाब लक्षात घेऊनच परफॉर्मन्स बँक गॅरंटीमध्ये शिथीलता मिळावी यासाठी, कोळसा मंत्रालयाला उद्योगक्षेत्राकडून असंख्य निवेदने प्राप्त झाली आहेत. राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांत झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे, ज्या निवीदा यशस्वीपणे स्विकारल्या गेल्या आहेत आणि कार्यवाहीच्या बाबतीत त्यांच्या खाणी या प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याआधीच्या टप्प्यापर्यंत पोहचल्या आहेत, अशांवरचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, आणि या सगळ्यामुळे खाणी कार्यान्वित करण्याच्या कामांसाठी निधी कसा उपलब्ध करावा, ही नवी समस्या निर्माण झाली असल्याचे या निवेदनांमध्ये म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खाणी कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान अशा निविदाधारकांवरील आर्थिक भार कमी करण्याकरता गुंतवणूकदाराभिमुख उपक्रम वा उपाययोजना राबवावी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. याद्वारे व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावात निविदाधारकांचा सहभागही वाढेल असे अपेक्षीत आहे. याच अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या लिलाव फेरीत ही नवी सुधारणा लागू करता यावी यासाठी कोळसा मंत्रालयाने, लिलावासाठीची अंतिम तारखेला मुदतवाढ देत, ती आता 13 जानेवारी 2023 ऐवजी 30 जानेवारी 2023 अशी केली आहे. मुंबईत खादी आणि ग्रामोद्योग उत्सव- २०२३चे उदघाटन…

महाराष्ट्रात जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार ३०० कोटींची गुंतवणूक

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. स्टुटगार्ट/प्रतिनिधी – राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या…

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील कंपन्यांना बजावली नोटीस

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्र सरकारने अनिवार्य केलेल्या मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक…

नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड खनिज-युक्त मातीमधून कृत्रिम-वाळूचे उत्पादन करणार

नेशन न्युज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी– मिनीरत्न कोळसा-उत्पादक कंपनी नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड त्याच्या अमलोहरी प्रकल्पातून बांधकामात…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web