भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

ठाणे/ प्रतिनिधी – भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा मुंबई उपनगरांमधील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. महायुती आणि महाविकास आघाडीची लढत इथे पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून भाजपचे खासदार कपिल पाटील तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून सुरेश म्हात्रे निवडणुकीच्या मैदानात आहे.

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ एतका महत्वाचा मतदारसंघ असून देखील नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाहीत. एकूण 25 जणांनी 54 नामनिर्देश अर्ज घेऊन गेले आहेत, अशी माहिती 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.

नामनिर्देश पत्रे घेऊन गेलेल्या पक्षांची/प्रतिनिधी पुढील प्रमाणे – भारतीय जनता पक्ष – 03, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 07, धनवान भारत पार्टी. – 01, संयुक्त भारत पक्ष – 01, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी. – 04, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) -05, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया -3, बहुजन समाजवादी पार्टी – 2, लोकराज्य पार्टी – 2, अपक्ष – 26 अशी एकूण 54 नामनिर्देशनपत्रे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी घेऊन गेले आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web