प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

प्रतिनिधी.

ठाणे – प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खरीप हंगाम २०२० पासून तीन वर्षाकरिता राबविण्यास मान्यता प्राप्त झाली आहे . शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले.खरीप हंगाम पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्ग आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेची जिल्हास्तरीय बैठक समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे पार पडली.या कार्यक्रमात कृषी संजीवनी सप्ताह 1 ते 7 जुलै दरम्यान सर्व तालुक्यात राबविण्यात येत आहे.या कृषी संजीवनी साप्ताहाच्या अनुषंगाने प्रचार प्रसार व प्रसिध्दी करण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2020 या भित्तीपत्रकाचे विमोचन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.‍शिवाजी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने,अग्रणी बॅक प्रंबंधक जयानंद भारती,इफको टोकिया कंपनीचे चीफ मॅनेजर सचिन सुरवसे उपस्थित होते.

*प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उद्दिष्ट्ये

नैसर्गिक आपती,किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे.

*योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

सदर योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. प्रधाननमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने करणारे शेतकरी पण पात्र आहे. सर्व अधिसूचित पिकासाठी ७०% असा निश्चित करण्यात आला आहे. उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षापैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या ५ वर्षाचे सरासरी उत्पन्न गणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल.

*जोखमीच्या बाबी

हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान तसेच पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांचे होणारे नुकसान पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कलावधीत नैसर्गिक आग,वीज कोसळणे,गारपीट,वादळ,चक्रीवादळ,पुर, क्षेत्र जलमय होणे,भूस्खलन,दुष्काळ,पावसातील खंड,कीड व रोग ईत्यादी बार्बीमुळे उत्पन्नात येणारी घट स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान (पिकाचे काढणीपासून 14 दिवस)

*ठाणे जिल्हयासाठी विमा कंपनी

इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, गुरगाव,हरियाणा,फोन नं. 020-41080200*विमा प्रकरणे व विमा हप्ता जमा करणे-* कर्जदार शेतकरी – कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा अंतिम मुदतीच्या सात दिवस देणे अपेक्षित आहे.कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होणेसाठी व सहभागी न होणेसाठी स्वतंत्र अर्ज करावेत.

बिगर कर्जदार शेतकरी-*

आपल्या विमा प्रस्तावाची आवेदन पत्र भरून व्यापारी बँकांच्या स्थानिक शाखेत प्रादेशिक ग्रामीण बँकेत / प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था / आपले सरकार सेवा केंद्र विमा कंपनीच्या अधिकृत विमा प्रतिनिधी किंवा विमा मध्यस्थामार्फत विमा हप्ता रकमेसह सादर करतील.

जन सुविधा केंद्र

आपले सरकार केंद्र (सीएससी-एसपीव्ही) बिगर कर्जदार शेतक-यांची नोंदणी जनसुविधा केंद्रामार्फत करता येईल.अधिक माहीतीसाठी जन सुविधा केंद्रावरील गावपातळी सेवक (VLE),कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकविमा काढावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,अंकुश माने यांनी केले आहे.


Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web