ठाणे मनपाच्या डिजि ठाणे कोविड 19 डॅशबोर्डवर प्रवासासाठी इ-परवाने उपलब्ध

प्रतिनिधी.

ठाणे – ठाण्यात कोविड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संसर्गाची शृंखला तोडण्यासाठी ठाणे महावगरपालिकेच्यावतीने जाहिर केलेल्या टाळेबंदीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी तसेच अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी-अधिकारी किंवा अन्य तातडीच्या गरजेच्या परिस्थितीतील व्यक्तींना संचार करणे सुलभ व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने ई पास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.महापालिकेच्या डिजीठाणे कोविड १९ डॅशबोर्डवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.ठाण्यातील नागरिकांना घरापासून त्यांच्या पूर्वनिश्चित मुक्कामापर्यंत जाण्या-येण्याचा प्रवास विना-अडथळा करता यावा यासाठी सदर डिजिटल उपक्रम डिजिठाणेने हाती घेतला आहे. टाळेबंदीच्या काळात ठाणे शहराबाहेर किंवा शहराच्या सीमांच्या आत प्रवास करण्यासाठी या आभासी टोकनचा उपयोग होऊ शकणार आहे.ठाणे मनपाच्या कोविड19 डॅशबोर्ड वरील ई – पास सिटी ट्रॅव्हल (शहरातील प्रवासाचा इ-परवाना), किंवा ‘इ-पास आउटसाइड सिटी ट्रॅव्हल (शहराबाहेरील प्रवासाचा इ-परवाना)’ या टॅब्सच्या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना ई-परवान्यासाठी सहज अर्ज करता येईल. त्यासाठी https://covidthane.org/ ही लिंक वापरायची आहे. नागरिकाच्या मोबाईलवर पुष्टीकरणार्थ एक संदेश (sms) पाठवला जाईल त्या प्रवासाकरिता एक विशिष्ट क्यूआर संकेतांक मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करावा लागेल.प्रवासाच्या इ-परवान्यांसंबंधी अधिक माहितीसाठी, डिजिठाणेशी 9819170170 या क्रमांकावर संपर्क करता येईल किंवा digithane.contact@thanecity.gov.in यावर ई-मेल पाठवता येईल. तरी नागरिकांनी या डॅशबोर्डचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web