केंद्रीय आरोग्य सचिवांनी बिल्थोव्हेन बायोलॉजिकल औषध कंपनीला दिली भेट

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्र यांनी नेदरलँड्समधील जागतिक औषध कंपनी बिल्थोव्हेन बायोलॉजिकलच्या उत्पादन युनिटला भेट दिली. बिल्थोव्हेन येथील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुर्गेन क्विक आणि पूनावाला सायन्स पार्क (पीएसपी) चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ डी क्लर्क यांच्याशी युरोपियन युनियनसह साथरोग सज्जता भागीदारी आणि लसींच्या उत्पादनावरील सहयोग या विषयावर त्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. त्यांनी वरिष्ठ व्यवस्थापनाची भेट घेतली त्यावेळी त्यांना सुविधेच्या विविध उत्पादन युनिट्सची माहिती देण्यात आली. त्यांच्या भविष्यातील उत्पादन योजनांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. बिल्थोव्हेन बायोलॉजिकल B.V. Co., बॅसिलस कॅल्मेट-ग्युरिन (BCG) यासह पोलिओ, घटसर्प धनुर्वात-यांसारख्या रोगांवरील लसींचे उत्पादन करते.

जैव अभियांत्रिकी आणि लस उत्पादन करणाऱ्या बिल्थोव्हेन बायोलॉजिकल ही कंपनी सीरम इंडिया लिमिटेड या कंपनीने 2012 मध्ये खरेदी केली होती. मार्च 2014 मध्ये भारत पोलिओमुक्त असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. पोलिओमुक्त स्थिती कायम ठेवण्यासाठी, देशभरात राष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय पातळीवर उच्च दर्जाच्या पोलिओ लसीने लसीकरण करण्यासाठी मुलांना पोलिओ लस दिली जाते. भारताला पोलिओमुक्त करण्यासाठी तोंडावाटे ओरल पोलिओ व्हॅक्सिनच्या थेंबाचा (OPV) शाश्वत पुरवठा आवश्यक असतो. बीबीआयएल ​​आणि सीरम मधील भागीदारी देशात ओपीव्हीचा शाश्वत पुरवठा करण्यास हातभार लावेल.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web