करोडो रुपयांचे सोने वितळवणारे तस्कर जेरबंद

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – सोने,अमली पदार्थ तसेच मूल्यवान वस्तूंच्या तस्करीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे तस्करी करण्याचा प्रयत्न या आधी बऱ्याच तस्करांनी केला आहे. पण डीआरआय च्या नजरेतून तस्कर वाचू शकले नाही. आफ्रिकेतून सोने तस्करी करून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे आनण्यात आले आहे. तसेच या सोन्यावरील विदेशी छाप काढून टाकून त्याला वितळण्याची प्रक्रिया करून तस्कर स्थानिक बाजारपेठेकडे विकायला वळवले जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने कारवाई सुरू केली. त्यानुसार,डीआरआय मुंबई विभागातील युनिटच्या अधिकाऱ्यांनी सोने वितळविण्याच्या या जागेची झडती घेतली आणि मूळ विदेशी सोने आणि 16.66 किलो चांदीसह 9.31किलो सोने जप्त केले.

या प्रकरणात वाहकांची व्यवस्था करणारा आणि तस्करी केलेले सोने गोळा करून वितळवणारा इसम आणि रिक्रुटर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. पाठपुरावा करण्यासाठी रिक्रुटरच्या कार्यालयाच्या आवारात शोध घेतला असता 190000 अमेरिकेन डॉलर्स सापडले, जे खरेदीदाराने तस्करीच्या सोन्याचे आगाऊ पैसे म्हणून आरोपीला दिले होते. आरोपीच्या झडतीदरम्यान 351 ग्रॅम विदेशी सोन्याचे तुकडे आणि 1818 ग्रॅम चांदीसह 1.91 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याच बरोबर आणखी एक पथक खरेदीदाराच्या जागेच्या परिसराच्या शोधासाठी रवाना करण्यात आले होते. मात्र, अधिकारी पोहोचण्यापूर्वीच खरेदीदार पळून गेला होता.

अधिक चौकशी केली असता असे उघड झाले, की ज्या आफ्रिकन नागरिकांकडून या इसमाने सोने गोळा केले आहे ते जवळच्या दोन हॉटेलांमध्ये राहत आहेत. त्यामुळे, दोन पथके रवाना करण्यात आली आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या आणि रिक्रुटरकडे देणाऱ्या 2 आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली. सर्व 4 व्यक्ती म्हणजेच 2 वाहक, सोने ने आणनारा आणि सोने वितळवणारा यांनी भारतातील सोन्याच्या तस्करीत सहभाग असल्याचे कबूल केले. सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web