राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६०.२२ मतदानाची नोंद

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघांमध्ये शांततेत मतदान पार पडले. कडाक्याच्या उन्हात नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस मतटक्का घसरलयाचे दिसून येते. शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 60.22 टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे-
९-रामटेक ५८.५० टक्के, १०-नागपूर ५३.७१ टक्के, ११-भंडारा- गोंदिया ६४.०८ टक्के, १२-गडचिरोली- चिमूर ६७.१७ टक्के आणि १३- चंद्रपूर ६०.०३ टक्के.पूर्व विदर्भातील या पाच मतदारसंघांत एकूण ९७ उमेदवार रिंगणात होते.या साऱ्यांना आता निकालासाठी ४ जूनपर्यंत तब्बल ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.दरम्यान,निवडणूक आयोगाने मतदानाची अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर केलेली नव्हती.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web