परराज्यातून शस्त्र विक्री करणारी टोळी जेरबंद

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

बुलढाणा/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील शस्त्रे विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही टोळी मध्यप्रदेशातून बुलढाणा जिल्ह्यातील निमखेडी या ठिकाणी शस्त्रे विकण्यासाठी येत असे. पोलिसांनी आरोपींकडून 4 देशी पिस्तूल,17 राऊंड, एक मोटर सायकल, तीन मोबाईल व 32,370 रोख असा एकूण 2 लाख 13 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणात मध्यप्रदेशातील पाचोरी येथून काही व्यक्ती येणार असून, देशी बनावटीच्या पिस्तूलाची डील करणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून एलसीबी व सोनाळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. भारसिंग मिसऱ्या खिराडेव, हिरचंद गुमानसिंग उचवारे, आकाश मुरलीधर मेश्राम, संदीप अंतराम डोंगरे यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींची विचारपूस सुरू आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web