मुस्लिम बांधव आता सेनेसोबत आहेत म्हणून ओवैसींचे पोट दुखते – अंबादास दानवे

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

संभाजीनगर/प्रतिनिधी – लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि उद्धवसेनेच्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख असलेल्या आ.अंबादास दानवे यांची शिवसेना (ठाकरे गट) नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. दानवे यांच्यामुळे मराठवाड्याला शिवसेनेचे दुसरे नेतेपद मिळाले.

अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत दानवेंनी आपले विरोधी पक्ष, निवडनुका आणि ईलेक्टोरल बॉण्डवर चर्चा केली. ते म्हणाले “दुधाला अनुदान मिळाले नाही. 80 टक्के लोकांना अनुदान मिळालेले नाही, गावात टँकर नाही, पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सरकार राजकारणात व्यस्त आहे. गारपीट झाली त्याचे पंचनामे करा, पीक विमा द्या,पंचनामे करायला प्रशासनाला कुणी रोखले आहे ? हा नियमित प्रकार आहे. पिकांचे खूप नुकसान झाले आहे मदत करायला हवी. सरकार प्रशासन हातावर हात बांधून बसले आहे. आम्ही निवडणूक आयोगाला भेटून सरकारला निर्देश द्यावे अशी मागणी करू.” असे म्हणत दानवेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

“साप कोण आहे हे ओवैसी यांनी क्लिअर करावे, खान की बाण पाहिजे म्हणजे सेनेचा नावाला विरोध नाही खान प्रवृत्तीला विरोध आहे. आमचे हिंदुत्व चूल पेटवणारे आहे, घर पेटवणारे नाही. ओवेसी फक्त भाजपला मदत करतात, मुस्लिम बांधव आता सेनेसोबत आहेत म्हणून ओवैसींचे पोट दुखते. तीन तलाखला समर्थ देणे चूक आहे का जे चांगलं आहे त्याला आम्ही मदत करू तीन तलाख योग्य नाहीच, या कायद्याने मुस्लिम महिलांना मदत झाली आहे. खान बाण राजकारण संपले आहे, मुस्लिम बांधव शिवसेनेसोबत आला आहे. दोघे गळ्यात गळे घालून उद्धजी च्या नेतृत्वखाली काम करत असेल तर आम्हाला आनंद आहे. आधी मुस्लिम समाजाचा धार्मिक उच्छाद होता म्हणून बाळासाहेब म्हणाले होते खान की बाण हा उन्माद शिवसेने ने संपवला आहे.” असे म्हणत दानवेंनी असदुद्दीन ओवैसी यांना टोला लगावला.

लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना दानवे म्हणाले की “आचार संहिता नियम सगळ्यांना लागू आहेत,वेगळे नियम कुणालाही नाहीत. बाळासाहेबांवर पण कारवाई झाली होती, नियम हवे तर निवडणूक योग्य वातावरणात होते. शिवसेनेच्या सभेत बेरोजगारी, शेतकरी, महागाई यावर सभा होतात. भाजपाच्या सभेत जनतेने जाब विचारावा नुसते सियाराम की जय म्हणु नये रामाचे नाव घ्यावे पण जनतेने जागरूक व्हावे. निलेश राणे यांची विनायक राऊत पुन्हा पेटी वाजवणार आहेत. राणे यांनी आपला मतदार संघ जपावा.” असे म्हणत अंबादास दानवे यांनी नीलेश राणेंना आवाहन केले.

दानवे यांना बीजेपी आणि ईलेक्टोरल बॉण्ड वर प्रश्न विचारला असता ते म्हणाले “पंतप्रधान चूक बोलतायत असे मी म्हणनार नाही. मात्र ज्या कंपन्यांना ईडीची नोटीस मिळाली त्याच कंपन्यांनी भाजपला ईलेक्टोरल बॉण्ड दिले इथे आमचे ऑब्जेकॅशन आहे, बॉण्ड घ्यायला ऑब्जेक्शन नाही. चंदा दो धंदा लो असे आहे, मेघा इंजिनीरिंगने अनेक ठिकाणी चूक केल्या आहेत मात्र त्यांनी भाजपला बॉण्ड दिले आहेत म्हणून कारवाई करत नाही. या कंपन्यांनी सगळ्यांना बॉण्ड द्यावे ना एकट्या भाजपला नाही.”

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web