कल्याण पूर्वेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपाने राज्यभरात मंदिराबाहेर आंदोलन केले. कल्याण पूर्वत देखील आई तिसाई मंदिराबाहेर भाजप आध्यात्मिक आघाडीतर्फे शंकनाद, टाळ मृदंग वाजवत मंदिर उघडण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली . यावेळी अध्यात्मिक आघाडीच्या कार्यकर्त्यांसह वारकऱ्यांनी थेट मंदिरात प्रवेश करत घंटानाद करत देवीची व प्रभू श्रीरामाची आरती केली . यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारने सगळ्या आस्थपना उघडल्या, बार रेस्टॉरंट उघडले मात्र मंदिर उघडले नाहीत मंदिरांमुळेच कोरोना होतो का असा सवाल केला? तर आध्यात्मिक व धार्मिक भावना चिरडण्याचा काम सरकार कडून सुरू आहे जो वर मंदिर उघडत नाही तोवर आमचे आंदोलन सुरूच राहील असा इशाराही यावेळी अध्यात्मिक आघाडीच्या वतीने देण्यात आला. यावेळी कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, परिवहन समिती माजी सभापती सुभाष म्हस्के, ह.भ.प चंद्रकांत सांगळे महाराज, कल्याण पूर्व मंडल सरचिटणीस नितेश म्हात्रे, अरुण दिघे, संदीप तांबे, पांडुरंग भोसले, गुड्डू खान, नगरसेविका हेमलता पावशे, अॅड. राखी बारोद आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web