बी. के. बिर्लाकॉलेज कल्याण येथील एमपॉवर सेलचे उद्घाटन,मानसिक आरोग्यसेवा होणार सहज उपलब्ध

कल्याण प्रतिनिधी– बिट्स गोवा आणि पिलानी कॅम्पसमधे 2018 आणि 2019 मधे यशस्वीपणे एमपॉवर सेलची सुरुवात केल्यानंतर एमपॉवरच्या संस्थापिका आणि अध्यक्षा श्रीमती नीरजा बिर्ला यांनी आज बी. के. बिर्ला कॉलेज (ऑटोनॉमस), कल्याण येथे एमपॉवर सेलचे उद्घाटन केले. या सेलतर्फे 11,000+ पेक्षा जास्त विद्यार्थी, 300+ पेक्षा जास्त शिक्षक सदस्य आणि बी. के. बिर्ला कॉलेजचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा पूर्णकेल्या जाणार आहेत. त्याशिवाय या सेलतर्फे 4000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 250 शिक्षक, बी. के. बिर्ला पब्लिक स्कूलचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना सेवा दिली जाणार आहे. एमपॉवर सेलच्या सेवा सेंच्युरी रेयॉन, सेंच्युरी रेयॉन हाय स्कूल आणि सेंच्युरी रेयॉन हॉस्पिटललाही दिल्या जाणार आहेत. हा उपक्रम मानसिक आरोग्याशी संबंधित दर्जेदार सेवा पुरवण्याच्या आणि कल्याण परिसरातील 75,000 लोकांना सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आला आहे.

या सेलच्या व्हर्च्युअल उद्घाटनावेळेस एमपॉवरच्या संस्थापिका आणि अध्यक्षा श्रीमती नीरजा बिर्ला म्हणाल्या, “मानसिक आरोग्य हा संवेदनशील विषय आहे आणि त्याविषयी आपल्या समाजात खोलवर अढी रूजलेली आहे. महामारीचा हा काळ बघता मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आज निर्माण झाली आहे. म्हणूनच त्याविषयी जागरूकतास्वीकारार्हता आणि योग्य वेळेत उपचार करण्याचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवणे अतिशय आवश्यक झाले आहे. हे करण्यासाठी समाज म्हणून आपल्याला एकत्र येऊन समस्येच्या मुळाशी जायला हवे. एमपॉवर सेलच्या या उपक्रमातून विशिष्ट समूहांना वैद्यकीय मदत पुरवण्याचे आमचे ध्येय आहे. एमपॉवर सेलबी. के. बिर्ला कॉलेज, कल्याण’ विद्यार्थीकर्मचारी आणि कल्याणमधील समुदायला वैयक्तिक समुपदेशनाची सोय उपलब्ध करून मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी व्यावसायिक मदत देणार आहे. मी बी. के. बिर्ला कॉलेजबी. के. बिर्ला स्कूलसेंच्युरी रेयॉन, सेंच्युरी रेयॉन हाय स्कूल आणि सेंच्युरी रेयॉन हॉस्पिटलच्या सर्व भागधारकांना या सेलमधील मानसिक आरोग्य क्षेत्रातील उच्चशिक्षितअनुभवी व्यावसायिकांची मदत घेण्याची विनंती करते. लाँचप्रसंगी उपस्थित असलेले बी. के. बिर्ला कॉलेजचे अध्यक्ष श्री. ओ. आर. चितलांगे म्हणाले, ‘आदरणीय श्रीमती नीरजा जी बिर्ला आणि त्यांची संस्था एमपॉवर मानसिक आरोग्य क्षेत्रात क्रांतीकार काम करत आहे. बी. के. बिर्ला कल्याण कॉलेजमधे एमपॉवरच्या माध्यमातून श्रीमती बिर्ला यांनी स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

महामारीचा काळ आल्यापासून एमपॉवरने मानसिक आरोग्याविषयी असलेली अढी कमी करण्यासाठी तीव्र मेहनत करायला सुरुवात केली व त्याअंतर्गत एमपॉवर 1ऑन1 टोलमुक्त मानसिक आरोग्य हेल्पलाईन (24×7), दुसऱ्या श्रेणीतील शहरांसाठी एमपॉवर ईक्लिनिक, शाळांसाठी ‘माइंड्स मॅटर – हा मानसिक आरोग्याचे शिक्षण देणारा अभ्यासक्रम, मानसिक आरोग्याविषयी समुपदेशन आणि मुंबई पोलिस व आरोग्यसेवा कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नियोजित थेरपी अशा विविध उपक्रमांतून हे काम केले जात आहे. या काळात एमपॉवरने टेलिकन्सल्टेशन सेवांच्या मदतीने अखंडित वैद्यकीय सेवा पुरवण्याची बांधिलकी जपली. यावर्षी एमपॉवरने देशभरात कोलकाता, पुणे आणि हैद्राबाद यांसारख्या ठिकाणी वैद्यकीय सेवांचा विस्तार करण्याची योजना आखली आहे.’

आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या पाठिंब्याने एमपॉवर हा मानसिक आरोग्य क्षेत्रातील उपक्रम असून देशात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता पसरवण्यात प्रवर्तक ठरला आहे. स्थापनेपासूनच एमपॉवरने मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या असलेले लोक व त्यांची काळजी घेणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची भेदभावपूर्ण वागणूक किंवा मानहानीस सामोरे न जाता त्यांचे जलद पुनर्वसन व्हावे यासाठी व्यावसायिक मदत, काळजी आणि स्वीकारार्हता मिळावी म्हणून यंत्रणा तयार करण्यावर भर दिला आहे. समग्र काळजी, जागतिक दजाचे बहुआयामी उपचार आणि जीवनशैलीविषयक बदलांच्या मदतीने एमपॉवर समाजाच्या मानसिक आरोग्य हाताळण्याच्या दृष्टीकोनात बदल घडवण्यासाठी कार्यरत आहे. सध्या मुंबई, बेंगळुरू, गोवा आणि पिलानी येथे एमपॉवरची वैद्यकीय केंद्रे सुरू आहेत. https://mpowerminds.com/

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web