भिवंडीत वाढीव वीज बिला विरोधात मनसे आक्रमक, फोडली टोरंट पावरची कार्यालये

प्रतिनिधी.

भिवंडी – वाढीव वीज बिल तसेच सक्तीची वीज बिल वसुली खोट्या वीज चोरीच्या पोलीस तक्रारी व टोरंट पावरचा मनमानी कारभार याविरोधात मनसेने गुरुवारी दुपारी आक्रमक पावित्रा घेत भिवंडीत वीज वितरण करणाऱ्या टोरंट पावर कंपनीची कार्यालये फोडली. शहरातील अंजूरफाटा येथील ओसवालवाडी त्याचबबरोबर वंजारपट्टी नाका चावींद्रा रोड येथील टोरंट पवारांची कार्यालाये मनसे कार्यकर्त्यांनी फोडली. यावेळी टोरंट पावरच्या मनमानी कारभाराचा निषेध करत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली . मनसेचे भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.  

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web