नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सन्मान

प्रतिनिधी. मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या…

जगन्नाथ शिंदे यांची रक्ततुला,धुळे जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशनने संकलित केले ३५७ युनिट रक्त

प्रतिनिधी. कल्याण – ऑल इंडिया केमिस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, माजी आमदार, तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे…

पुणे जिल्ह्यात ११ लाख ३२ हजार ३५१ बालकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट

प्रतिनिधी. बारामती – राज्यातून, देशातून पल्स पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम नियमित राबवण्यात…

शक्ती फौजदारी कायदे विधेयक बाबत संयुक्त समितीची बैठक संपन्न

प्रतिनिधी. औरंगाबाद – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक-51 शक्ती फौजदारी…

औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचा प्रेरणादायी उपक्रम, महिला पोलीसांवर बीट अंमलदाराची जबाबदारी

प्रतिनिधी. औरंगाबाद – राज्यात औरंगाबाद पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयाने नवीन आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. यात…

भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो कोच मुंबईत दाखल

प्रतिनिधी. मुंबई – भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला असून महानगराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुसह्य…

राष्ट्रीय मिल संघ वाचनालयाचा मराठी भाषा संवर्धन दिन सपन्न

प्रतिनिधी. मुंबई – राष्ट्रीय मिल मजदूर संघ,ग्रंथालय- वाचनालयाच्या वतीने दि.१४ ते २८ जानेवारी पर्यंत मराठी भाषा…

१ फेब्रुवारी पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी वेळा आखून रेल्वे सेवा सुरु

प्रतिनिधी. मुंबई – कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र…

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लिलावप्रकरणी संबंधितांवर कारवाई होणार

महाराष्ट्र

मुंबई महापालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक उपक्रमाचा शुभारंभ, पर्यटकांसाठी खुश खबर

प्रतिनिधी. मुंबई– मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सुरु करण्यात येत असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुंबईकरांबरोबरच राज्यातील, देशातील आणि परदेशातील पर्यटकसुद्धा भारतातील अग्रगण्य अशा मुंबई महापालिकेच्या इमारतीचा वारसा पाहण्यासाठी येतील. यातून या वास्तुचा आणि मुंबईचा इतिहास आणि महत्त्व त्यांना कळण्याबरोबरच मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका मुख्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भाई जगताप, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह मुंबई महापालिका समिती अध्यक्ष, गटनेते, नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, भारताचे अग्रगण्य शहर ही मुंबईची ओळख पुर्वीपासून आहे. साधारण सव्वाशे वर्षापुर्वी अंदाजपत्रकापेक्षा कमी किंमतीत आणि कमी वेळेत महापालिकेची ही वास्तू बांधून पूर्ण करण्यात आली. इतकी वर्षे होऊनही आजही इमारत मजबुत आहे. बांधकाम क्षेत्रासाठी हे काम निश्चितच आदर्शवत असे आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना सध्या आपण काही ठराविक पर्यटनस्थळे दाखवतो. यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. आज मुंबई महापालिकेच्या हेरीटेज वॉकची त्यात भर पडली आहे. याच पद्धतीने मुंबईतील किल्ल्यांचा विकास करुन तेथील पर्यटनालाही चालना देता येईल. फिरोजशहा मेहता यांच्यासह अनेक महापुरुषांनी या इमारतीतून मोठे योगदान दिले आहे. उपक्रमामुळे या सर्व महापुरुषांचा इतिहास आणि त्यांचे कार्य सर्वांना माहित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्यात नुकताच कारागृह पर्यटनाचा उपक्रम सुरु करण्यात…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web