वंचित बुहजन आघाडीचा महाराष्ट्र बंद यशस्वी(संघर्ष गांगुर्डे नेशन न्युज मराठी.)

दि.- २४ वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला आहे. असे सर्व महाराष्ट्रात दिसून आले आहे .वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. आम्ही बंदसाठी कोणावरही जबरदस्ती केली नाही तसेच हिंसाचारही केलेला नाही अस बाळासाहेब आंबेडकर यांनी सागितले. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले त्यांनी महाराष्ट्र बंदला भरभरून प्रतिसाद दिला.व्यापार आणि कार्यालय यातील उपस्थिती नगण्य होती. सीएए आणि एनआरसीच्या विरोधासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी हा बंद पुकारला होता. वंचितसह ३५ संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला १०० संघटनांनी पाठिंबा दिला.
अमरावतीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज चुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना सोडून दिले.घाटकोपरमध्ये बसवर झालेली दगडफेक आमच्या कार्यकर्त्याने केलेली नाही. दगडफेक करणारा चेहरा झाकून आला होता. दगडफेक केल्यानंतर तो पळून गेला. चेहरा झाकून आंदोलनात उतरायचे नाही हे आम्ही आधीच कार्यकर्त्यांना सांगितले होते.व आमच्या सर्व कार्यकर्त्याने त्याचे पालन केले. संपूर्ण महाराष्ट्रा बंद यशस्वी झाला. एनआरसी आणि सीएए या कायद्याचा मुस्लिमांवरच नव्हे, तर हिंदुवरही परिणाम होणार आहे. हिंदुनाही नागरिकत्व सिद्ध करताना अडचणी येतील असे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले. देश दिवाळखोरीच्या उंबरठयावर आहे. फेब्रुवारीमध्ये तोटयाच बजेट सादर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारकडून २४ लाख कोटी जमतील सांगण्यात आलं होतं. पण त्यातले ९ लाख कोटी जमा होणार नाही अशी स्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं. वंचित च्या कार्यकर्त्यान कडून कुठेही गालबोट ना लागता हा महाराष्ट्रा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे.
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web