निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमा केल्या १६१ बंदुका

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पोलिसांची भूमिका फार महत्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांच्या सेवेत दिवस-रात्र तत्पर असणाऱ्या पोलिसांवर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सुरू असलेले गैरप्रकार उघडकीस आनण्याची त्याचप्रमाणे नागरिकांच्या सुरक्षेची महत्वाची जबाबदारी आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण मतदारसंघ येतो. या मतदारसंघातील बहुतांश भाग ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो. तर, उर्वरित नवी मुंबई, मिरा भाईंदर आणि ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रातील भाग येतो.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. निवणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी परवाना बंदूक धारकांना आपले शस्र जमा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 205 जणांकडे परवानाधारक शस्त्र होते. यामधील 161 जणांनी आपले शस्त्र जमा केले आहेत. अशी माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे. तसेच निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web