गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा ‘आईज अँड ईअर्स’ उपक्रम

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

डोंबिवली/प्रतिनिधी – रेल्वे ट्रॅक ,रेल्वेस्थानक व लोकल ट्रेनमध्ये चोरी ,हल्ले ,लुटपाट असे गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. रेल्वे स्थानक आणि स्थानक परिसरात असे गुन्हे सर्रास घडत असतात. घटनेच्या ठिकाणी उपस्थित नागरिक हे गुन्हे बघतात, गुन्हेगारांना ओळखतात पण याची माहिती पोलिसांना द्यायला घाबरतात. यासाठीच आता रेल्वे पोलिसांनी ‘आईज अँड इअर्स’ म्हणजेच डोळा आणि कान उपक्रम सुरु केला आहे.

या उपक्रमात स्टेशन परिसरातील स्टॉल्सवर काम करणारे कर्मचारी, हमाल, सफाई कर्मचारी, रिक्षाचालक यांना सहभागी करण्यात आले आहे. हे सर्व आता पोलिसांचे डोळे व कान बनून काम करत आहेत. पोलिसांना माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जात असून आरोपींची यांच्यामार्फत पोलिसांना माहिती मिळते व या माहितीच्या आधारे पोलीस तत्काळ आरोपींना गजाआड करतायत. त्यामुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यात मोठ्या प्रमाणात यश आल्याचं डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले.

या उपक्रमात स्टेशन परिसरातील स्टॉल्सवर काम करणारे कर्मचारी, हमाल, सफाई कर्मचारी, रिक्षाचालक यांना सहभागी करण्यात आले आहे. हे सर्व आता पोलिसांचे डोळे व कान बनून काम करत आहेत. पोलिसांना माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जात असून आरोपींची यांच्यामार्फत पोलिसांना माहिती मिळते व या माहितीच्या आधारे पोलीस तत्काळ आरोपींना गजाआड करतायत. त्यामुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यात मोठ्या प्रमाणात यश आल्याचे डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले. स्टेशन परिसरात दिवस-रात्र वावरणारे हे घटक पोलिसांचे डोळे आणि कान बनल्याने गुन्ह्यांना आळा बसलाय. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी विविध पथके तयार केली आहेत. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली चोरीची घटना व तीन दिवसांपूर्वी झालेला मुख्याध्यापकावर हल्ला या दोन्ही प्रकरणातील आरोपी या उपक्रमामुळे चार-पाच तासातच पकडण्यात यश आल्याची माहिती डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शिसवे यांनी दिली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web