तलावात बुडून मुलाचा मृत्यू,कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- वंचित बहुजन युवा आघाडी

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे /प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून या शहराचा गाजावाजा केला जातो आहे. अशातच महापालिकेच्या संभाजीनगर येथील जलतरण तलावात बुडून 17 वर्षे मुलाचा मृत्यू झाला आहे. संभाजी नगर जलतरण तलाव या ठिकाणी असलेले व्यवस्थापक, जीवरक्षक तलावावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या सर्व कामगारांच्या निष्काळजीपणामुळे मुलाला जीव गमवावा लागला आहे.असे वान्चीताचे आरोप आहेत.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे या अधिकाऱ्यांवर एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो, म्हणून 304 अ या कायद्याअंतर्गत एखाद्याच्या मृत्यू जबाबदार म्हणून शिक्षा होते तसेच 337 कलम सध्या दुखापतीच्या बाबतीत व 338 गंभीर दुखापतीसाठी कलम लावता येते. देखभालीसाठी जबाबदार मनपा कंत्राटदार, सल्लागार यांच्या चुकीमुळे मृत्यू किंवा अपंगत्व असल्यास संबंधिताला एक लाख रुपयांपर्यंत दंड ठरवला जाऊ शकतो, तरी वरील कलमाप्रमाणे मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच ठेकेदार यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. असे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने देण्यात आले.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकत्यांनी स्विमिंग कॉस्ट्यूम फ्लोटर व कॉस्ट्यूम ट्यूब परिधान करून महापालिकेच्या इमारतीमध्ये जाहीर निषेध करून पालिकेचे उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष चंद्रकांत लोंढे, ज्ञानेश्वर शेळके ( संपर्कप्रमुख), सुनील जावळे( उपाध्यक्ष), संतोष डोंगरे (प्रसिद्धीप्रमुख), इस्माईल नदाफ (संघटक), वैभव सरोदे (भोसरी विधानसभा अध्यक्ष), सुजित कांबळे (उपाध्यक्ष), बादल गायकवाड (उपाध्यक्ष), श्रेयश लाटकर, घरकुल शाखाध्यक्ष जॉय गायकवाड, संजय निर्मळ, आदित्य गायकवाड,अक्षय गुंजे, बंटी पवार, अरुण गायकवाड, अनिकेत राऊत,रितिक उमप, कृष्णा कारकूड, राहुल आवटे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web