खबरदार सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट कराल तर, कल्याण पोलिसांनी दिला कडक कारवाईचा इशारा

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टला कमेंट करणाऱ्याला अल्पवयीन मुलाला अर्धनग्न करून मारहाण करून , जमीनीवर नाक घासण्यास लावल्याची धक्कादायक घटना कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी खडकपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाच जणांना यात ताब्यात घेतले आहे.व इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.

कायदा हातात घेत एका अल्पवयीन तरुणासोबत असे कृत्य केल्याबद्दल कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी नागरिकांना कोणीही कोणाबद्दल आक्षेपार्ह विधान करु नये ,अफवांवर विश्वास ठेवू नये, आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन उमेश माने पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण यांनी केले आहे.

तर काही दिवसांपासून कल्याणमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात इंस्टाग्रामवर जोरदार वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने एका समाजाच्या देवस्थाना विषयी अज्ञात कडून करण्यात आलेल्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केले होते. दुसऱ्या गटाने या तरुणाचा शेाध घेतला आणि त्याला शोधून काढत त्याला आधी मारहाण केली. त्याला अर्धनग्न करुन जमीनीवर नाक घासण्यास भाग पाडले. हा व्हिडियो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन तरुणाच्या तक्रारीनुसार त्याला मारहाण करणारे आणि जमीनवर नाक घासण्यास भाग पाडणाऱ्याच्या 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करत 5 जणांना ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे आक्षेपार्ह विधान करणाऱ्या दुसऱ्या गटाच्या विरोधाकावर ही उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात याआधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कायदा हातात घेत एका अल्पवयीन तरुणासोबत असे कृत्य केल्याबद्दल कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना कोणीही कोणाबद्दल आक्षेपार्ह विधान करु नये. अफवांवर विश्वास ठेवून नये. आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास पोलिसांना कळवावे कायदा हातात घेऊ नये, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी कल्याण पोलिसांच्यावतीने उमेश माने पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण यांनी दिला आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web