कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्याना तात्काळ आरोग्य दाखला देण्याची दीपेश म्हात्रे यांची मागणी

प्रतिनिधी.

डोंबिवली – कोकणात गणेशोत्सवासाठी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना तात्काळ आरोग्य दाखला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये गणेशोत्सव साठी चाकरमानी प्रवास करत असतात.सध्या स्थिती पाहता चाकरमान्यांना आरोग्य दाखला मिळवण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे.हेल्थ पोस्ट व महापालिकेच्या सर्वच हॉस्पिटलांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पेशंट असल्याने नागरिकांमध्ये भीती व चिंतेचं वातावरण आहे.हेल्थ पोस्ट व हॉस्पिटल मध्ये दाखला मिळण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. ही सर्व परिस्थिती बघता या सर्व नागरिकांना दाखला मिळण्यासाठी स्वतंत्र केंद्र तात्पुरत्या स्वरूपात कल्याण व डोंबिवली येथे उभारण्यात यावी जेणेकरून नागरिकांना आरोग्य दाखला मिळणे सोपे होईल.अशी मागणी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web