छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट महावितरणकडून चार महिने आधीच  पूर्ण

नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी – राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले १०० मेगावॅटवीजनिर्मितीचे उद्दीष्ट महावितरणने चार महिने आधी पूर्ण केले असून या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी वीजग्राहकांचे आणि महावितरणच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. उद्दीष्ट पूर्ण झाले असले तरीही महावितरण ही मोहीम यापुढेही चालू ठेवणार असून अधिकजोमाने काम करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.  छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलरमुळेग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर त्यांना ती महावितरणला विकता येते.छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकांना चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानेमहावितरणला १९ जानेवारी २०२२ रोजी ‘रूफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज २’ अंतर्गत १९ जानेवारी २०२४ पर्यंत दोन वर्षात घरगुती ग्राहकांसाठी १०० मेगावॅटचे उद्दीष्ट दिलेहोते. महावितरणने हे उद्दीष्ट सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले. केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाला महावितरणकडून राज्यातील कामगिरीबाबत दर महिन्याला अहवाल पाठविण्यात येत आहे. कंपनीकडून राज्यात छतावरील सौरऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांना मदत करण्यात येते. याविषयीची माहिती https://www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.  महावितरणने छतावरील सौर ऊर्जा निर्मिती संच बसवून देण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली व संबंधित यंत्रणांशी चांगला समन्वय साधला. त्यामुळे चार महिने आधीउद्दीष्टपूर्ती करता आली. रूफ टॉप सोलरविषयी उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. राज्यात २५ सप्टेंबर रोजी रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची एकूण संख्या १,०६,०९० झाली आहे व एकूण वीजनिर्मिती क्षमता १,६७५ मेगावॅट इतकी झाली आहे. राज्यात २०१६ – १७ या आर्थिक वर्षात केवळ १,०७४ ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते व त्यांची एकूण क्षमता २० मेगावॅट होती. त्यानंतरमहावितरणकडून विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत गेली.  सर्वसाधारणपणे एखाद्या कुटुंबाला ३ किलोवॅटचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प पुरेसा ठरतो. त्यासाठी सरकारकडून सुमारे ४३ हजार रुपये ते ५६ हजार रुपये अनुदान मिळते. तीन किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पांना तीन किलोवॅटनंतर प्रत्येक किलोवॅटला सुमारे सात ते नऊ हजार रुपये अनुदान मिळते. वैयक्तिक वीज ग्राहकांसोबतचहाऊसिंग सोसायट्याही रूफ टॉप सोलर योजनेचा लाभ घेतात व त्यांनाही अनुदान मिळते. हाऊसिंग सोसायट्यांना ५०० किलोवॅटपर्यंतचा प्रकल्प बसविता येतो वसार्वजनिक सुविधेसाठीच्या या प्रकल्पांना प्रति किलोवॅट ७२९४ रुपये अनुदान मिळते.

अल्ट्रा झकास’ मराठी वर कामगारांच्या जीवनावर भाष्य करणारा’महासत्ता’

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गावर चालून महात्मा…

लोकअदालतीत वीज ग्राहकांची १८२४ प्रकरणे निकाली,२ कोटी ६१ लाखाचा भरणा

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी – तालुकास्तरावर शनिवारी (०९ सप्टेंबर) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी…

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलादची मिरवणूक काढणार, मुस्लीम बांधवांचा निर्णय

नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी – अनंत चतुर्दशी आणि ईद-ए- मिलाद हे उत्सव एकाच…

लळींग घाटात गॅस टँकरला ट्रॉलाची धडक, चालक गंभीर

नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी -मुंबई – आग्रा महामार्गावरील लळींग घाटात आज भरधाव कंटेनरचे अचानक ब्रेक…

इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा सहकारी संस्थेची अटीतटीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर

नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी – इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा सहकारी संस्था सन 2023…

ग्राम रोजगार सेवकांचा विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा

नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा/प्रतिनिधी – वर्ध्यात ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने न्याय व हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच…

बंदर परिसर मासेमारीच्या नव्या हंगामासाठी सज्ज

नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी – नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केल्यानंतर मच्छीमार बांधव…

मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री                         

नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी – महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र…

राख्यांच्या ऑनलाईन विक्रीचा किरकोळ व्यावसायिकांना फटका

नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी – भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web