निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाशिक मध्ये राजकीय सभांचा धडाका

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नाशिक/प्रतिनिधी – २०२४ ची ही लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण २०१४,२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बीजेपीने मोठे यश मिळविले होते. पण २०२४ ची लोकसभा निवडणूक बीजेपीसाठी मोठी कसोटीची समजली जात आहे. सतत आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशभर आपल्या पक्षाचा प्रचार करत सभा घेत आहेत. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

नाशिक मधील पिंपळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार असून पंतप्रधानांच्या या भव्य सभेसाठी खास तयारी करण्यात आलेली आहे. पंतप्रधान महायुतीच्या उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना बळ देण्यासाठी येत आहेत. त्यामुळेच आज सकाळ पासूनच मोदींच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे .

तसेच महायुतीला टक्कर देण्यासाठी आणि आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी नाशिक मधील वणी येथे सभा आहे. शरद पवार सुद्धा नाशिकात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या या सभेत हजर असतील. महाविकास आघाडीच्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचे बघायला मिळत आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web