भारतीय तटरक्षक दलाने ३० हजार लीटर अवैध डिझेल केले जप्त

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – भारतीय तटरक्षक दलाचे समुद्रात होणाऱ्या प्रत्येक लाटेवर आणि हालचालीवर ही बारीक नजर असते. त्यामुळे सागरी मार्गाचा अवलंब करून केली जाणारी तस्करी, अवैध मालाची विक्री यांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर परत एकदा भारतीय तटरक्षक दलाने 12 मे 2024 रोजी नैऋत्य मुंबई पासून 27 सागरी मैलावर असणारी ‘आई तुळजाई’ नावाची मासेमारी नौका ताब्यात घेतली. ताब्यात घेतलेल्या नौकेचा अत्यंत बारकाईने तपास केला तेव्हा त्यात अंदाजे 30 लाख रुपये किंमतीचे सुमारे 30,000 लीटर अवैध डिझेल सापडले. डिझेल तस्करी करणाऱ्या या संशयित बोटीला भारतीय तटरक्षक दलाच्या वेगवान गस्ती नौका आणि इंटरसेप्टर नौकेने ही कारवाई केली आहे.

आरोपींनी मासे ठेवण्याच्या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल लपवलेले होते. तटरक्षक दलाच्या कारवाईत 1.75 लाख रुपये बेहिशेबी रोकडही नौकेवरून हस्तगत करण्यात आली. नौकेवरून अटक केलेल्या कर्मचाऱ्यांनी बेकायदा माल संशय घेणार नाहीत, अशा मच्छिमारांना विकण्याचा आपला बेत होता, अशी कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेली नौका भारतीय तट रक्षक दलाच्या मध्यस्थी नौकेने मुंबई बंदरात आणली. पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी नौका सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली आहे. या बेकायदा कृत्याविरोधात समावेशी कायदेशीर कारवाई व्हावी या हेतुने इतर किनारा सुरक्षा विभाग जसे की पोलीस, मत्स्य विभाग आणि महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात आले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web