हार्वेस्टरच्या वापराने शेतकऱ्यांनी वाचवले लाखों रुपये

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

गोंदिया/प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातला असून या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पीक खराब होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. पीक कापनीच्या ऐनवेळीच पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच पिकांच्या कापनीसाठी पारंपारिक पद्धतीचा वापर करताना जास्त वेळ लागत असल्याची बाब समोर आली.

त्यामुळे शेतकरी आता आपल्या शेतातील धान पीक कापणीसाठी पारंपारिक पद्धतीने कापणी न करता हार्वेस्टर चा वापर करून शेतामध्ये कापणी करत आहेत. जेणेकरून लवकरात लवकर कापणी करून धान्य सुरक्षित ठेवता येईल. शेतकरी आता अत्याधुनिक अशा हार्वेस्टरकडे वळले आहेत. दर तासाला 4000 रुपये प्रमाणे हार्वेस्टरचा खर्च येतो. या हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांना धान्य जमा करता येते आणि मजुरांचा त्रासही कमी होतो. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात सुद्धा या हार्वेस्टरला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web