होर्डिंगमुळे झालेल्या मृत्युंना शिंदे सरकार जबाबदार असल्याचा संजय राऊतांचा आरोप

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्रात एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे. मात्र दुसरीकडे संजय राऊत यांनी नाशिक भूसंपादन घोटाळ्याचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी नाशिक भूसंपादन घोटाळ्यावर मोठे खुलासे केले सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.

नाशिक भूसंपादन घोटाळ्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले “हे भारतीय जनता पक्षाची लोक आहेत जे मुंबईतले महाराष्ट्रातले सातत्याने मुंबई महानगरपालिकेतल्या कारभाराकडे बोट दाखवतात. खरं म्हणजे मुंबई महानगरपालिका ज्यांनी लुटली. मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात होत्या, ते यशवंत जाधव, रवींद्र वायकर त्याआधी सरवणकर हे सगळे महापालिकेतले सुभेदार ज्यांनी महापालिकेची लूट केली. ते सगळे आज भारतीय जनता पक्षात आहेत. 2020-2022 या काळात शहराच्या विकासासाठी आरक्षित भूसंपादनाची गरज आहे. असा भास निर्माण केला, आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने 175 कोटी रुपये किमतीची भूसंपादनाची कारवाई करण्याची परवानगी दिली. यात महापालिकेच आर्थिक हित जपलं जावं, आणि जेवढी जमीन आवश्यक आहे तेवढीच जमिनीच भूसंपादन करावी अशा सूचना होत्या. पण नगर विकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते हे लक्षात घ्या” असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

“यशवंत जाधव यांच्यावर ईडी, सीबीआयची रेड पडली. त्याच कारणावरून रवींद्र वायकर यांच्यावर काही कारवाया झाल्या ते घाबरून भाजपात गेले. हे सगळे मुंबई महापालिकेचे लाभार्थी होते. या प्रकरणात मुलुंडचा नागडा पोपटलाल किंवा भाजपचे अन्य लोक त्यांनी शिवसेनेला वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात महापालिका आहे. त्यामध्ये नाशिक महापालिका सर्वात महत्त्वाची महापालिका आहे. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असल्यापासून ज्याप्रकारे लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे त्याचा आत्तापर्यंत कोणी विचार केला नाही आणि माहिती घेतली नाही.”

“नगर विकास खात्याच्या या नेतृत्वाने नाशिक मधली जी आपली बिल्डर लॉबी आहे. त्यांचा फायदा व्हावा म्हणून 157 कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा महापालिकेचे प्रशासन तेथील भाजपचे पदाधिकारी आणि आपल्या मर्जीतले बिल्डर यांच्या लाभासाठी 800 कोटी रुपयांचे भूसंपादन केले. आठशे कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले. शासनाने ठरवून दिलेले जे प्राधान्यक्रम होते जागा ताब्यात घेण्यासाठी, त्या कोणत्याही नियमांचे पालन केले नाही आणि साधारण 800 कोटी रुपये आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना दिले. काही बिल्डरांनी त्या काळामध्ये जमिनी विकत घेतल्या. शेतकरी नसतानाही जमिनी विकत घेतल्या आणि त्याच जमिनी एका महिन्यामध्ये पाचपटीने वाढवून त्या बिल्डरांनी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये घेतले, अशी 27 प्रकरणे आहेत. स्वतः छगन भुजबळ त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.” संजय राऊत यांनी या प्रकरणाचा तपास व्हाया यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. याबद्दल ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहून त्या संदर्भात माहिती दिली की, हे भूसंपादन अत्यंत बेकायदेशीर आणि त्यात मोठा आर्थिक घोटाळा आहे, तुम्ही या भूसंपादनाची चौकशी करा. माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार 64 प्रकरणांमध्ये कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत. अनेक बिल्डरांनी आपण शेतकरी असल्याचा दाखवलं, महापालिकेशी व्यवहार केला, त्यानंतर अनेक जमिनीचे न्यायालयामध्ये दावे सुरू आहे. ज्या जमिनी महापालिकेने घेतल्या त्यातल्या अनेक जमिनी ज्यांचे न्यायालयात दावे सुरू आहेत.”

“एमआयडीसी तर्फे ज्या रस्त्याचे भूसंपादन आधीच झालेले आहे त्या रस्त्यावरील जमिनींना सुद्धा महापालिकेने साधारण पंचवीस कोटी रुपये मोजलेले आहेत. ठक्कर बिल्डर यातला सर्वात मोठा लाभार्थी आहे. या ठक्कर बिल्डरने त्याच्याकडे मालकी नसताना सुद्धा या जमिनी महापालिकेला देऊन कोट्यावधीचा मलिदा त्यातून घेतलेला आहे. हेच ठक्कर बिल्डर मुख्यमंत्र्यांबरोबर काल मांडीला मांडी लावून बसलेले होते. याच ठक्कर ने 300 कोटी भूसंपादनाच्या व्यवहारातून मिळवलेले आहेत. जनतेच्या पैशांची ही सरळ सरळ लूट आहे. दोन कोटींची जमीन ठक्कर यांनी विकत घेतली आणि महापालिकेला 50 कोटींना विकली. अख्खं ठक्कर कुटुंब या व्यवहारामध्ये अडकलेलं तुम्हाला दिसेल. प्रत्येक व्यवहाराचा पुरावा माझ्याकडे आहे. एक फाईल मी मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे, देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवणार आहे. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कार्यालय आणि ईडीला सर्व माहिती दिलेली आहे. ठक्कर बिल्डरला या प्रकरणात 355 कोटींचा लाभ झाला. इतर बिल्डरांना 200 कोटी रुपयांचा लाभ झालेला आहे. महापालिकेतील अधिकारी यांना 12 कोटींचा लाभ झाला. तुम्ही मुंबई महापालिकेच्या कोविड, खिचडीची चौकशी करता, त्यांना अटक करता, त्यांच्यावर ईडीची कारवाई करता तर ही सरळ-सरळ नाशिक महानगरपालिकेची लूट आहे. तसेच या सर्व प्रकरणाचे लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नगर विकास खात्यातील अधिकारी आहेत, त्यांचे बिल्डर आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी, एसआयटी स्थापन करावी या प्रकरणाची ईडीने चौकशी करावी, या बद्दल गुन्हे दाखल व्हावेत जर असं नाही झालं तर जेव्हा आमचं सरकार बदलेल तेव्हा या 800 कोटी घोटाळ्यातील सर्व लाभार्थ्यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. तसेच नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी मी नाशिक शहर दत्तक घेतो अशी घोषणा 2017 साली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केली. तेव्हा लोकांना वाटलं नाशिकचा विकास होईल, भरभराट होईल. पण, पाच वर्षांच्या सत्ता काळात नाशिक शहराचा विकास होण्याऐवजी नाशिक महानगरपालिकेच्या तिजोरीची पूर्णपणे लूट केली. त्याचं आता फक्त एक प्रकरण मी समोर देत आहे.”

मुंबईत झालेल्या वादळी पावसामुळे घाटकोपर येथे बेकायदेशीररित्या लावण्यात आलेल्या पोस्टरमुळे मोठी दुर्घटना घडली. यावरी संजय राऊत यांनी भाष्य केले. “अडीच तीन वर्षापासून महापालिकेवर शासन कोणाचे आहे? शिवसेना सत्तेत आहे का भाजपाच राज्य आहे? प्रशासनाचे राज्य आहे. असे प्रश्न त्यांनी विचारले. तसेच 800 कोटीच्या भ्रष्टाचारांवर बोला, यांना कोणी परवानगी दिली? बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे. गेल्या अडीच वर्षापासून कोणाचेही राज्य नाही. भारतीय जनता पक्ष, शिंदे गट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहेत. त्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला हेच जबाबदार आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web