पंतप्रधान मोदींना देश तोडायचा आहे – प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

चंद्रपूर/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. सध्या प्रकाश आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते आपल्या प्रचाराबरोबरच सातत्याने पंतप्रधान मोदींनवर हल्ला करत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परत एकदा जहरी टीका केली ते म्हणाले “राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत.पंतप्रधान मोदी म्हणतात की, पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने 2029 च्या निवडणुकीची तयारी करावी. दुसऱ्या बाजूस सत्तेत नसणारी काँग्रेस देश फोडणार असाही प्रचार चालू आहे. देशाचा जो एकोपा आहे यातील सर्वांत महत्वाचा घटक राजकीय पक्ष असल्याचेही आंबेडकर म्हटले. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप त्यांनी या वेळेस केला.

ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले की “कोणतीही योजना आली की, ती सरकारची आहे असे न मांडता ती नरेंद्र मोदींची आहे अशी मांडली जाते. ज्यांनी काँग्रेस संपवायची गोष्ट केली, त्यांनी स्वतःहून भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग अवलंबलेला आहे.

“आरएसएसशी आमचे मतभेद कायम आहेत. पण मी मोहन भागवतांना विचारतो की, मागील अडीच वर्षांत आपण किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितला किंवा त्यांना तुम्ही सांगितलं आहे की, आपण भेटलं पाहिजे” असा सवाल आंबेडकर यांनी मोहन भागवतांना केला. “या अडीच वर्षांत नरेंद्र मोदी आणि त्यांचा जो कार्यकर्ता आहे, त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे की, नरेंद्र मोदी हे जर मोहन भागवतांना भेटत नसतील, तर त्यांनी मोदींचा प्रचार का करावा. कारण, प्रचार करताना भाजपचा उमेदवार आहे असे सांगितले जात नाही, तर मोदींचा उमेदवार आहे असे सांगितले जाते. त्यामुळे भाजप संपला आहे अशी परिस्थिती असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतांच्या संदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले की “मराठा समाजातील गरीब मराठा समाज हा जरांगे पाटील यांना स्वतःचा मार्गदर्शक मानत आहे. 30 टक्के मतदार हा जरांगे पाटील म्हणतील तसे मतदान करणार आहे.”

मोदींवर सर्वाधिक टीका करण्याच्या यादीत वंचितचे प्रकाश आंबेडकर आहे. महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील बरीच जनता प्रकाश आंबेडरकरांनसोबत आहे. त्यामुळे एकट्या बीजेपीच्या च्या विरुद्ध कॉँग्रेस आणि बहुजन आघाडी अशी लढत पाहायला मिळतेय. आता मायबाप जनताच ठरवणार की त्यांना परत ‘मोदी राज’ हवंय की परिवर्तन हवे आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web