वंचित बहुजन युवक आघाडीचा ‘युवा संवाद मेळावा ‘संपन्न

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक/ प्रतिनिधी – दिंडोरी तालुक्यातील वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सर्व मान्यवरांचा सत्कार तालुका कार्यकारणी केला. या मेळाव्याला शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. मेळाव्यामध्ये प्रामुख्याने दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यांबद्दल आक्रमक होऊन आंदोलन करण्याचा निर्धार युवा कार्यकर्त्यांनी घेतला.

विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आणि तहसीलदार यांना मोटरसायलवरून तालुक्यातील रस्त्यांनी फिरवून निवेदन देण्याचं निर्धार या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे यांनी बोलवून दाखवला. सटाणा येथे आदिवासी हक्क परिषदेसाठी गाव लेव्हलला बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन युवक तालुका अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केले.

येणाऱ्या काळात युवक आघाडीच्या शाखा , पक्षाची सभासद नोंदणी , प्रबुद्ध भारत ची सभासद नोंदणी या बद्दल ज्येष्ठ नेते नितीन भुजबळ , सम्यकचे जिल्हा अध्यक्ष मिहिर गजबे, महानगर प्रमुख रवी पगारे यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी मेळाव्यात आकर्षण असणारे इंडियन आयडॉल फेम चे सुप्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर गीत गाऊन कार्यक्रमात ऊर्जा निर्माण केली.

प्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये युवक आघाडीचे प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे , ज्येष्ठ नेते नितीन भुजबळ , महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा उर्मिला गायकवाड , महानगर प्रमुख रवी पगारे, सम्यक चे माजी राज्य सचिव संविधान गांगुर्डे, सम्यकचे जिल्हा अध्यक्ष मिहिर गजबे , महिला जिल्हा नेत्या कोमल पगारे, ज्येष्ठ नेते रविराज सोनवणे व इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुक्याचे महासचिव विकी दुर्धावळे यांनी केले .

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web