बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा

नेशन न्यूज मराठी टीम.

धुळे / प्रतिनिधी – साक्री तालुक्यातील वडगाव या परिसरात बनावट मद्यचा कारखाना सुरू होता. परिसरातील नागरिकांनी तशा तक्रारी देखील केल्या होत्या. तक्रारींची दखल घेत पिंपळनेर पोलिसांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडपाडा येथे छापा मारून बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उध्वस्त केला. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलिसांच्या अधिकारी कर्मचारी पथकाने वडपाडा येथील बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा मारून कारवाई केली.

या कारवाईत पिंपळनेर पोलिसांनी देशी दारू, टॅंगो पंच सारखी देशी दारू तयार करण्यासाठी लागणारा स्पिरिटचा साठा, टॅंगो पंच कंपनीचे बूच, बाटल्यांवर लावण्यासाठी टॅंगो पंच कंपनीचे स्टिकर्स, टाक्या, बाटल्याना बुच लावण्यासाठी लागणारे पॅकिंग मशीन, बनावट दारू वाहतुकीसाठी लागणारी वाहनं तसेच इतर साहित्य सामग्री असा एकूण सुमारे तब्बल 10 लाख 47 हजार 15 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या ठिकाणाहून हस्तगत केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पिंपळगाव वडपाडा येथील एका घरात बनावट देशी दारू तयार केली जात आहे. या माहितीच्या आधारे, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनी श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. यावेळी, दोघे आरोपी देशी बनावटीची टॅंगो पंच दारू तयार करत असताना रंगेहाथ पकडले गेले. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 10 लाख 47 हजार 15 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत संशयित आरोपींनी देशी दारू कंपनीच्या नावाचा वापर करून कंपनीची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोघे आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

गेल्या सात-आठ महिन्यांपासून साक्री तालुक्यातील वडगाव या परिसरात अगदी सर्रासपणे हा बनावट मद्यचा कारखाना सुरू होता. परिसरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने पिंपळनेर पोलिसांनी ही किरकोळ कारवाई केल्याचं म्हटलं जातं आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web