‘तैवान एक्स्पो २०२३’ व्यापारी प्रदर्शनाचे मुंबईत आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई / प्रतिनिधी – व्यापाराच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय संबंध सलोख्याचे असल्यास माहितीव तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे सोयीचे जाते. सध्या भारत व तैवान देखील एकमेकांच्या सहकार्यासाठी एकत्र येताना दिसत आहेत. मुंबईत असेच एका प्रदर्शनाच्या माध्यमातून भारत व तैवान चे व्यापारी प्रतिनिधी संवाद साधणार आहेत. भारतीय बाजारपेठेची क्षमता वाढवणारी तैवान एक्सपोर्ट मुंबईत दाखल झाली आहे. नेस्को एक्सिबिशन सेंटर, गोरेगाव येथे दिनांक ५ ते ७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत बहुप्रतिक्षित, तैवान एक्स्पो २०२३ भारतामध्ये व्यापाराची व्याप्ती वाढविण्यासाठी सज्ज झाला आहे भारतातील एक्स्पोची ही ६वी आवृत्ती असून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये भारतीय व्यापाऱ्यांना तैवानमधील व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे त्यामुळे प्रदर्शक आणि अभ्यागताना उत्पादन पोर्टफोलिओसह अधिक जवळून पाहण्याची आणि सखोल अनुभवात्मक संवाद साधता येईल यंदाच्या एक्स्पोमध्ये स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, स्मार्ट सिटी, स्मार्ट ऍग्रीकल्चर स्मार्ट लाइफस्टाइल या प्रमुख श्रेणींमध्ये ६ थीम, ७ पॅव्हेलियन प्रदर्शनात असतील.

तैवान एक्स्टर्नल ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिलचे (तैत्रा) उप कार्यकारी संचालक के जे चेंग म्हणाले, “भारतात तैवान एक्स्पोच्या आणखी एका आवृत्तीचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत आहे हा एक्स्पो अलीकडील सरकारी धोरणे, स्थानिक बाजारातील मागणी आणि सध्याच्या ट्रेंडवर आधारित नवीनतम उत्पादने प्रदर्शित करणार आहोत. शिवाय, तैवान आणि भारतातील व्यवसायामधील परस्परसंवादाला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक्स्पो नेटवर्किंग इव्हेंट्स आयोजित करीत आहोत, ज्यामध्ये वन ऑन-वन बिझनेस मॅच मीटिंग आणि विविध स्टेज इव्हेंटचा समावेश आहे दोन्ही देशामधील द्विपक्षीय व्यापार संबंधांना चालना देणारा सर्वोत्तम टप्पा निर्माण करणे व सुरू ठेवण्याची आम्हाला आशा आहे.अलिकडच्या वर्षात जागतिक पुरवठा साखळी फ्रेमवर्कमध्ये भारत स्वत ता एक व्यवहार्य पर्यायी केंद्र म्हणून तयार करत आहे आणि राजकीय आणि आर्थिक परिस्थिती भारत आणि तैवान या दोन्ही देशांना मजबूत व्यावसायिक द्विपक्षीय संबंधद्वारे परस्परदेशी साध्य करण्यासाठी सहकार्यासाठी नेव्हिगेट करण्याची संधी प्रदान करते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web