कोकण पदवीधर मतदारसंघ अंतिम मतदार याद्या ३० डिसेंबर प्रसिद्ध होणार

नेशन न्यूज मराठी टिम.

कल्याण/प्रतिनिधी – १ नोव्हेंबर, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोग तसेच राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी, यांनी जाहिर केला आहे. त्यानुसार पदवीधरांच्या मतदार याद्या नव्याने तयार करणार असल्याने कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघांसाठी पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. 

३० सप्टेंबर रोजी जाहिर अधिसूचना जारी केल्यानंतर पुर्नप्रसिद्धी करून नंतर ६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर रोजी हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत.त्यानंतर ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी घोषीत केली जाणार आहे. मागच्या वर्षीपर्यंत ४६ हजार मतदारांची नोंदणी झाली होती. यात वाढ करण्यासाठी राजकिय पक्ष तसेच अन्य माध्यमाद्वारे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, विवाहानंतर मुलींच्या नावात होणाऱ्या बदलामुळे मतदानास मुकावे लागु नये, यासाठी माहेर व सासर अशा दोन्ही नावांचा समावेश असलेला पॅनकार्ड हा दस्तऐवज पुरावा म्हणुन ग्राह्य मानला जाणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web