अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी, प्रवासी आरोपी अटकेत

नेशन न्यूज मराठी टीम.

धुळे / प्रतिनिधी – अवैध पदार्थाची तस्करी प्रकरणी संशयित आरोप्याला धुळे पोलिसांनी अटक केली आहे. इंदूरहून मालेगावकडे जाणाऱ्या खासगी बसमधून गुटख्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला धुळे तालुका पोलिसांनी पकडले. ही कारवाई मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी गावाजवळ केली गेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी जवळून दीड लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला.

इंदूर येथून पुण्याच्या दिशेने एम.पी. ३०, पी. ७७७० क्रमांकाची खासगी बस जात आहे. या बसमधून गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती धुळे तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच आर्वी दूरक्षेत्रासमोर तालुका पोलिसांनी नाकाबंदी केली. धुळ्याकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसची तपासणी सुरू केली. त्यावेळी संशयित आरोपी प्रवाशाची तपासणी केली असता त्याच्याकडे गुटख्याचा साठा आढळून आला.

ताब्यात घेऊन चौकशी केली असता इंदूर येथून गुटखा खरेदी करून पुणे येथे विक्री करण्यासाठी वाहनात घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून १ लाख ५२ हजार २२४ रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web