रामेश्वर धबधबा परिसरातील हिरवाई ठरतेय पर्यटकांचे आकर्षण

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड / प्रतिनिधी – विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागात अपुऱ्या पावसाचे परिणाम दरवर्षीच शेतकरी व सामान्य नागरिकांना सहन करावे लागत आहेत. पाणलोट क्षेत्र पुरेसे न भरल्याने वर्षभर पुरेसा होईल असा पाण्याचा साठा नसल्यने प्रशासनाला पाणी कपात करावी लागते. परंतु गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने समाधान व्यक्त केले जात आहे. व धबधबा परिसरातील हिरवाईचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पाऊले पाण्याकडे वळू लागली आहेत.

दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे बीडच्या पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील धबधबा प्रवाहित झाला आहे.यंदा जास्त पाऊस न झाल्याने विंचरणा नदी कोरडीच होती. परिणामी या नदीवरील असलेला हा धबधबा कोरडा होता.परंतु गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने धबधबा प्रवाहित झाले आहे.तसेच या परिसरातील हिरवाई पर्यटकांना आकर्षित करू लागली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web