बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार

नेशन न्यूज मराठी टीम.

बुलढाणा / प्रतिनिधी – वाढत्या लोकसंख्येचा परिणाम जंगलक्षेत्र कमी होण्यात झाला आहे. मानवी वस्त्या जंगलाच्या दिशेने वाढत जाऊन आपली शेती व वस्त्या स्थापू लागले आहेत. बिबटा या मानवव्याप्त जंगल क्षेत्रात भक्षाच्या शोधात भटकताना दिसतो. घनदाट शेतात झुडुपामागे दडून बसलेला बिबटा अचानक शेतकऱ्यावर हल्ला चढवतो. बुलढाणा जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुनिल निवृत्ती झिने , वय 38 असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत शेतकरी शेतात काम करीत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला.

देव्हारी गावचे रहिवासी असलेले सुनिल झिने यांची अभयारण्याच्या सीमेवर शेती आहे. शेतात काम करीत असतांना मागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला, परंतु तो अपुरा पडला.सुनिल झिनेच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन आसपासच्या शेतीतील माणसे घटनास्थळी धावली. त्यांनी बिबट्याला पिटाळून लावले.मात्र तोपर्यंत झिने यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर वन्यजीवचे अधिकारी यांना माहिती मिळताच घटना स्थळी भेट दिली आणि मृतदेहाला सामान्य रुग्णालयात पोस्ट मार्टम साठी आणण्यात आले होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web