नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड/प्रतिनिधी – नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव या बौद्ध युवकाची जातीयवादातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्या गावातील जातीय तणाव दूर व्हावा आणि सामाजिक सलोखा राखून भीम जयंती साजरी व्हावी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रयत्न केले आणि भीम जयंती गावात साजरी झाली. मात्र त्या गोष्टीचा राग मनात धरून जातीयवादी लोकांनी अक्षयवर हल्ला केला आणि त्याचा निर्घृण खून केला. घटना घडल्या नंतर पक्षाचे पदाधिकारी धावुन गेले रात्री उशिरापर्यंत थांबून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव टाकून तातडीने गुन्हे दाखल करुन आरोपींना बेड्या ठोकण्यास भाग पाडले.अशी माहिती फारुख अहमद यांनी दिली.
अजुन ही प्रमुख आरोपी फरार असुन त्यांना तात्काळ अटक व्हावी तसेच अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, शिवाय नांदेड जिल्ह्यात वाढत असलेल्या जातीय अत्याचाराला पायबंद घालावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलली नाही तर वंचित बहुजन आघाडी आक्रमक आंदोलन पुकारेल असा इशारा फारुख अहमद यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरकारला दिला.