४ ते १८ जूनपर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणारे सण / उत्सव तसेच विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा होणार आहेत. त्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दि. ०४ जून २०२३ रोजी ००.०१ वाजेपासून दि. १८ जून २०२३ रोजी २४.०० वाजेपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.

या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. कोणत्याही इसमाचे चित्राचे/ प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे/ प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.

हा मनाई आदेश सरकारी नोकर, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. तसेच लग्न कार्यासाठी जमलेले लोक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका, सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण यांना हा आदेश लागू राहणार नाहीत.

हा मनाई आदेश दि. ०४ जून २०२३ रोजी ००.०१ वाजेपासून दि. १८ जून २०२३ रोजी २४.०० वाजेपर्यंत अंमलात राहील. हा मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उप आयुक्त डॉ. परोपकारी यांनी कळविले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web