लोकसभेच्या निवडणुकी जिंकण्यासाठी धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम होईल -धनंजय मुंडेंचा भाजपवर निशाना

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड /प्रतिनिधी – बीडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. लोकसभेची निवडणूक समोर आहे. आता धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. ज्या देशावर मुघल आणि इंग्रजानी राज्य केले.

ज्या देशाची लोकसंख्या 130 कोटींच्या घरात आहे. त्यात बहुसंख्य हिंदू आहेत. मात्र आता निवडणूक समोर आल्यावर हिंदू खतरे मे है असे म्हणतील. नेत्यांचे नाव न घेता धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. धर्मा धर्मात तेढ निर्माण करून त्यांना लोकसभा निवडणूक जिंकायची असल्याचे देखील मुंडे यांनी म्हटले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web