कल्याण पूर्वेत कंटेनरच्या धडकेने दोन रिक्षा चक्काचूर

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण पश्चिमेतील श्री तिसाई माता उड्डाणपूल जवळ एक कंटेनर अचानक रस्त्यावर बंद पडल्याने घटनास्थळी उभे असलेल्या वाहतूक पोलिसांनी एकतर्फी रस्ता बंद करत कंटेनर बाजूला घ्यायचा प्रयत्न करत होते.

याच दरम्यान कंटेनरचे स्टेरिंग लॉक झाल्याने कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर विरुद्ध दिशेने जात असलेल्या दोन दिक्षांना कंटेनरची धडक लागली. या धडकेत दोन्ही रिक्षा अक्षरशः चक्काचूर झाल्या असून या रिक्षेत बसलेले रिक्षा चालक व चार प्रवासी सुदैवाने वाचले असून यापैकी एक रिक्षा चालक गंभीर जखमी व दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.

या अपघातामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून सध्या वाहतूक पोलीस घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवासी व रिक्षा चालकाला खाजगी रुग्णाला दाखल करत कंटेनर व रिक्षाला बाजूला घेत वाहतूक कोंडी नियंत्रणात आणत पुढचा तपास सुरू केला आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web