लोढा पलावा चौक ते निळजे रेल्वेस्थानकपर्यंतच्या रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर सम-विषम पार्किंग

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील लोढा पलावा चौक ते निळजे रेल्वेस्थानक पर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूस प्रायोगिक तत्वावर सम-विषम वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याचे ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

डोंबिवली शहर व परिसरात नागरी संकुले, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, इत्यादीच्या संख्येत वाढ व मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली व्यापारी संकुले उदा. माँल्स, मल्टिप्लेक्स थिएटर्स, इत्यादींमुळे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे वाहन पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने डोंबिवली पूर्व हद्दीतील सध्याची वाहतुकीची परिस्थिती व वाहन पार्किंग करीता उपलब्ध असलेली जागा इत्यादीचे सर्वेक्षण करून रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंग, सम-विषम पार्किंग याप्रमाणे वाहन पार्किंग जागेचे वर्गीकरण करण्यात येवून या वर्गीकरणाप्रमाणे मुख्य बाजारपेठेकडे व रेल्वे / बस स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही अशा पद्धतीने सम विषम पार्किंगची व्यवस्था लागू केली आहे, असे पोलीस उप आयुक्त डॉ. राठोड यांनी कळविले आहे.

वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे- नो पार्किंगचे ठिकाण :- लोढा पलावा चौक ते निळजे रेल्वे स्टेशन पर्यंत सुमारे 1.8 किमी दोन्ही बाजूस पी-1, पी-2, नोपार्किंग करण्यात आली आहे. ही अधिसुचना प्रसिद्ध झाल्या तारखेपासून 15 दिवस प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात काही हरकत अगर सुचना असल्यास त्या लेखी स्वरुपात पोलीस उप आयुक्त, शहर वाहतुक शाखा कार्यालय, तीन हात नाका. एल. बी. एस. मार्ग, ठाणे. ४००६०२ येथे पाठवाव्यात. याबाबत कोणाच्या काही हरकत अथवा आक्षेप प्राप्त न झाल्यास सदरची अधिसूचना पुढील आदेश होईपर्यंत कायम स्वरुपात अंमलात राहील, असे उप आयुक्त डॉ. राठोड यांनी कळविले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web