नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कल्याण शहरातील वायले नगर येथे २९ मार्च ते २ एप्रिल  या कालावधीत नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज  सायंकाळी संपन्न झाले.   यावेळी विभागीय अधिकारी माविम कोकण विभाग मंगेश सूर्यवंशी, माविम ठाणे जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते, माविम ठाणे उपजीविका विकास सल्लागार हेमंत पाटील, माजी नगरसेवक सुनील वायले आदी मान्यवर उपस्थित होते.        

मविमंच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण शहरी भागातील महिला बचतगटाचे उत्पादित  मालाचे विक्री प्रर्दशन नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे माध्यमातून वायले नगर येथे सुरू झाले असून महिला सक्षमीकरणाच्या दुष्टीकोनातून तसेच कार्पोरेट बाजारपेठ च्या युगात महिला बचत गटानी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून त्यांच्या महिला बचतगटाच्या मालाचे ब्रडिंग होण्यासाठी ही काळाची गरज असल्याचे या नवतेजस्विनी ठाणे ग्रामीणत्सावाच्या माध्यमातून साधले आहे.                     

या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी  मान्वरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.  स्थानिक नगरसेवक सुनील वायले यांनी या कार्यक्रमास मैदानाची सोय करून कल्याण (युलीबी  )च्या  महिला बचत गटांना यामध्ये प्राधान्य मिळवून देण्यात मदत केली. 
यामध्ये कुरडया ,पापड्या, लोणची, तांदूळ, मसाले, वारली पेटींगच्या कलाकुसरीच्या वस्तू, बांबू च्या टोपल्या  माहिलांची शुगांर प्रसाधन साधने,  घरगुती फुल झाडे रोपवाटिका, शेतीची लहान सहान अवजारे,  आदि वस्तू महिला बचत गटाच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web