नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर/प्रतिनिधी – सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे भूसंपादनामध्ये अक्कलकोट तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आज सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील बॅगेहळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे.
वारंवार प्रशासनाकडे आणि पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन सुद्धा कोणताच मार्ग निघत नसल्याने आज संतप्त शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आम्हाला आमची शेतजमीन द्यायचीच नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. यावेळी रास्ता रोको आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. लवकरच आमच्या समस्या सोडवल्या नाहीत तर आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.