नेशन न्यूज मराठी टिम.
नासिक/प्रतिनिधी – निफाड येथील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात एन आय एन डब्ल्यू 36 हा नियंत्रित पाण्यात भरघोस उत्पन्न देणारा गव्हाचे वाण शेतकऱ्यांकरता विकसित केला असून एक किंवा दोन पाण्यात प्रति हेक्टरी 30 ते 35 क्विंटल उत्पन्न घेता येणार आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अतंर्गत निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात नियंत्रित पाण्यात गहू उत्पादन देणारा एन आय एन डब्ल्यू 36 हा वाण खास शेतकऱ्यांकरिता विकसित केला आहे. केंद्रीय पीक वाण मान्यता समितीने देखील गहू वाणास शिक्कामोर्तब केले आहे. एक किंवा दोन पाण्यातच याचे उत्पन्न येत असून प्रति हेक्टरी 30 ते 35 क्विंटल गहू यातून मिळत असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे एक पाणी असेल त्यांनी 40 ते 41 दिवशी या गव्हास पाणी देऊ शकत आहेत. ज्याच्याकडे दोन पाणी उपलब्ध त्यांनी 20 ते 21 दिवसांनी पाणी द्यावे. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांकडे नियंत्रित पाणी आहे अशा शेतकऱ्यांकरीता हे गव्हाचे वाण विकसित आहे.अशी महिती डॉ. निलेश मगर सहाय्यक प्राध्यापक वनस्पती शास्त्र विभाग यांनी दिली.