कृष्णा, कोयना, वेण्णा, निरा आणि उरमोडी नद्यांच्या काही भागाचा जल प्रदुषणाच्या यादीत समावेश

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

मुंबई/प्रतिनिधी – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्य सरकारांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या सहकार्याने राष्ट्रीय जल गुणवत्ता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियमितपणे नद्यांच्या पाण्याचे परीक्षण करते. याअंतर्गत सातारा जिल्ह्यातील कृष्णा, वेण्णा, कोयना, निरा आणि उरमोडी नद्यांचीही पाहणी करण्यात आली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोव्हेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानूसार या नद्यांतील पाण्यात बायोकेमिकल ऑक्सिजची (BOD) मात्रा जल प्रदूषणाच्या पातळीवर असल्याचे आढळून आले आहे. याविषयीची तपशीलवार माहिती पुढील तक्त्यात देण्यात आली आहे. 

S. No.RiverIdentified polluted river stretchMaximum BOD observed(mg/ l)Priority Class
1KrishnaAlong Mahabaleshwar and along Satara11.0III
2Nira (Krishna)Sarola to Sangavi15.0III
3KoynaAlong Karad7.5IV
4UrmodiAlong Nagthane6.8IV
5VennaMahabaleshwar to Mahuli7.2IV

नद्यांची स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पाणी हा राज्य सूचीतील विषय आहे, आणि तेथील प्रदूषण रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाण्यावर विहित नियमांनुसार प्रक्रिया करणे सुनिश्चित करणे ही राज्ये/केंद्रशासित प्रदेश, स्थानिक स्वराज्य संस्था आणि उद्योगांची सामुहिक जबाबदारी आहे.

नद्यांच्या संवर्धनासाठी केंद्रीय जलस्रोत मंत्रालय राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेच्या (NRCP) केंद्र सरकार पुरस्कृत योजनेद्वारे देशातील नद्यांमध्ये आढळून आलेले प्रदूषण कमी करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य देऊन राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना मदत करते. महाराष्ट्र सरकारकडून अद्याप सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या स्वच्छतेसाठी कोणताही प्रस्ताव आला नाही.

केंद्रीय मंत्री बिश्वेश्वर टुडू यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.  

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web