विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचविण्यात वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशला यश

नेशन न्यूज मराठी टीम.

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापुरातील कुमठे येथील सावतखेड घोडातांडा परिसरातील शेतकरी संदीप माणिक पवार यांच्या शेतातील विहिरीत एक कोल्हा पडला होता. संदीप हे शेतात पाणी देण्यासाठी म्हणून विहिरीत असलेली मोटार चालू करताना त्यांना विहिरीत पाण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी विहिरी जवळ जाऊन पाहिल असता विहिरीत त्यांना कोल्हा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी लगेचच गावातील राहुल पवार यांच्याशी संपर्क साधला. राहुल यांनी कोल्हा विहिरीत पडल्याची माहिती वनविभागाला कळविण्यासाठी ऑफिसला फोन केला पण ऑफिस बंद असल्याने फोन उचलला गेला नाही. वेळ न दडवता राहुल यांनी चेतन गायकवाड यांना सदर माहिती दिली गायकवाड यांनी लगेचच वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशनचे सदस्य संतोष धाकपाडे यांना कळविले. WCAS चे सदस्य संतोष धाकपाडे, सुरेश क्षीरसागर, अजित चौहान आणि ओंकार घुले हे सर्वजण घटनास्थळी पोहचले. भाजीचे कॅरेट, दोरी आणि बांबू या उपलब्ध असलेल्या साधनाने WCAS च्या सदस्यांनी कोल्ह्याला अलगद कॅरेटमध्ये घेऊन बाहेर काढले. या बचाव कार्याला साधारण दोन तासाचा कालावधी लागला. कोल्हा कॅरेटमध्ये बसून वर आल्यावर क्षणातच त्याने तिथून शेतात धूम ठोकली. या बचाव कार्यात वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांबरोबर विजय राठोड, राहुल पवार, सद्दाम शेख, आदीनी परिश्रम घेतले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web