जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

नंदुरबार/प्रतिनिधी – जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून राज्यातील 18 लाख कर्मचारी बेमुदत संपावर बसले आहेत .नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास 17 हजार कर्मचारी या उपोषणात सहभागी झाले आहेत. शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सात दिवसापासून कर्मचारी आंदोलन करीत आहेत. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत उपोषण असेच सुरू राहील, असे कर्मचारी संघटने कडून वारंवार सांगण्यात येत आहे.

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज नंदुरबारात थाळीनाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. नंदुरबार पंचायत समिती आवारात झालेल्या आंदोलनात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, तहसील कर्मचारी यासह अनेक संघटनाचे कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी महिला व पुरुषांनी थाळी वाजवून निदर्शने केली. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील व यापुढे अधिक तीव्र करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनात महिला व पुरुषांची संख्या लक्षणीय होती.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web