दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – पवई विभागात असलेल्या आयआयटी मुंबईत दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या ७ व्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना १२ फेब्रुवारीला घडली होती. मात्र दर्शनची आत्महत्या नाही तर हत्या आहे. त्याच्यावर जातीय अत्याचार झाल्याचा आरोप करीत त्याच्या कुटुंबीयांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह पवई पोलीस ठाण्यात धडक दिली.

दर्शन सोलंकी हा १९ वर्षीय विधार्थी मूळचा हैद्राबादचा रहिवासी होता. दर्शन तीन महिन्यापूर्वीच रसायनशास्त्रच्या शिक्षणासाठी आयआयटी साठी मुंबईत आला होता.१२ फेब्रुवारीला७ व्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या मृत्यू नंतर आता ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे आरोप विविध पक्ष आणि सामाजिक संघटना करीत आहेत. दर्शनचे वडील रमेश सोलंकी, आई कर्लिका सोलंकी आणि इत्तर नातेवाईकांनी यांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप केला आहे. दर्शनचा जातीय छळ आयआयटी मध्ये सुरु होता असे त्यांचे म्हणणे आहे. या बाबत गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे .

मात्र या प्रकरणात एस आयटी नेमण्यात आली असल्याने आपली मागणी त्यांच्याकडे पोहचवू असे पोलिसांनी त्यांना सांगितले. यावर प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात यावा यासाठी सोलंकी कुटुंब आणि बहुजन वंचित आघाडी कार्यकर्ते ठाम होते. अखेर त्यांचे निवेदन स्वीकारले गेले. मात्र आपण हा लढा सुरु ठेवणार असल्याचे दर्शनच्या वडिलांनी सांगितले. तर या बाबत आयआयटी समोर आंदोलन करणार असल्याचे बहुजन वंचित आघाडी कडून सांगण्यात आले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web