संगमनेर – लोणी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धड़कने बिबट्या गंभीर जखमी

नेशन न्यूज मराठी टीम.

संगमनेर/प्रतिनिधी – संगमनेर – लोणी महामार्गावर सकाळी रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे बिबट्या गंभीर जखमी झाला. या बिबट्याला मोठ्या शिताफीने वनविभागाने ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी संगमनेरच्या निबांळे येथिल रोपवाटिकेत हलवले आहे. संगमनेर – लोणी महामार्गावरील चिचंपूर फाट्यालगत असलेल्या अस्मिता डेअरी जवळ एक भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला बेदरकारपणे उडवले व सुसाट वेगाने ते वाहन पुढे निघून गेले. यावेळी जोरदार प्रहार झाल्यामुळे हा बिबट्या जबर जखमी होत रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात जाऊन पडला होता.

यावेळी येथिल स्थानिक नागरीकानी याबाबतची माहिती वनविभागाला दिली असता घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन वनक्षेत्रपाल माळी, वनपाल प्रशांत पुंड, वनकर्मचारी अशोक गिते, रवीद्रं पडवळ, सोनवणे, जारवाल व मुंढे यांच्यासह आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शांताराम झोडंगे व संतोष शिदें घटनास्थळी हजर झाले होते. दरम्यान, बिबट्याचा अपघात झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने वेदनेने विव्हळत असलेल्या जखमी बिबट्याला पाहण्याबरोबरचं फोटो व विडिओ काढण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी उसळली होती. यावेळी वनविभागाने लांब काठीच्या साह्याने बनवलेल्या फाशाच्या मदतीने बिबट्याला अलगद पिजंऱ्यात टाकले. यानंतर या बिबट्याला निबांळे येथिल रोपवाटिकेत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अंदाजे ३ वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. तर अपघातात या बिबट्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याबरोबरचं कंबरेला मोठी दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web