महाज्योती’च्या लोकसेवा आयोग परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी आणखी ४८ विद्यार्थ्यांची निवड

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील एकुण 1500 विद्यार्थ्यांना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. यापैकी 48 जागा या रिक्त होत्या. या रिक्त जागा भरण्यासाठी ‘महाज्योती’ चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी मान्यता दिली आहे.

त्यामुळे या प्रशिक्षणासाठी आणखी 48 जणांची निवड होणार आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी 48 जागा भरण्याची मागणी व्यवस्थापकीय संचालक खवले यांच्याकडे केली होती. या विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून ‘महाज्योती’ने तातडीने निर्णय घेऊन रिक्त जागा भरण्यासाठी गुणानुक्रमानुसार 48 पात्र उमेदवारांची निवड यादी संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web