भारतीय अन्न महामंडळाने ई-लिलावामध्‍ये दोन दिवसांत ९.२ लाख मेट्रिक टन गव्हाची केली विक्री

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – देशातील गहू आणि गव्हाच्या पिठाच्या  वाढत्या किमती नियंत्रणात आणण्‍यासाठी, मंत्र्यांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार, भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) केंद्राकडून गव्हाच्या ई-लिलावासाठी राखून ठेवलेल्या 25 लाख मेट्रीक टन (एलएमटी) गव्हाच्या साठ्यापैकी 22 लाख मेट्रिक टन देण्याची तयारी दाखविली. खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत (घरगुती) विविध मार्गांद्वारे बाजारातील साठ्याचा 1 आणि 2 फेब्रुवारी 2023 रोजी ई- लिलाव करण्‍यात आला.

ई-लिलावात पहिल्या आठवड्यात 1150 हून अधिक बोलीदार सहभागी झाले आणि देशभरात 9.2 लाख मेट्रिक टना ची विक्री झाली.

ई लिलावाद्वारे गव्हाची विक्री मार्च 2023 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दर बुधवारी देशभरात सुरू राहणार आहे.

ई-लिलावाच्या पहिल्या आठवड्यात 100 ते 499 मेट्रिक टनांपर्यंत जास्तीत जास्त मागणी होती, त्यानंतर 500-1000 मेट्रिक टन आणि त्यानंतर 50-100 मेट्रिक टन इतकी मागणी होती.  लहान आणि मध्यम आटा गिरणी मालक आणि व्यापाऱ्यांचा लिलावात सक्रिय सहभाग होता. एकाच वेळी जास्तीत जास्त 3000 मेट्रिक टनासाठी फक्त 27 बोली प्राप्त झाल्या.

एफसीआयने लिलावासाठी सरासरी दर  2474 रूपये प्रति क्विंटल असा निश्चित केला.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ई-लिलावात एफसीआयने 2290 कोटी रूपये मिळवले.

केंद्रीय भंडार, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) यासारख्या सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या/सहकारी संस्था/ महासंघ यांना मिळालेल्या 3 एलएमटी गव्हाचे,  पिठामध्ये रूपांतर करण्यासाठी 2350 रूपये प्रति क्विंटल अशा सवलतीच्या दराने ई-लिलावाशिवाय विक्रीसाठी  उपलब्ध झाला आहे.  आणि जास्तीत जास्त लोकांना 29.50 रूपये प्रति किलो दराने किरकोळ किमतीत गहू देण्यात आला. एनसीसीएफला 7 राज्यांमध्ये 50, 000 मेट्रिक टन गहू वितरणासाठी देण्यात आला. देशभरामध्‍ये  गव्हाच्या पिठाच्या किमती खाली आणण्यासाठी या योजनेअंतर्गत 1 एलएमटी गहू नाफेडला आणि 1 एलएमटी गहू केंद्रीय भंडारला दिला जातो. केंद्रीय भंडारने या योजनेअंतर्गत गव्हाचे पिठ  विकण्याची योजना सुरू केली आहे. नाफेड ही योजना ८ राज्यांमध्ये सुरू करणार आहे.

ई-लिलावाने गेल्या एका आठवड्यात गव्हाच्या बाजारभावात 10% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. ई-लिलावात विकला जाणारा गहू उचलल्यानंतर आणि आटा बाजारात उपलब्ध झाल्यानंतर भाव आणखी घसरतील.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web