शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली असून इच्छुकांनी दि. 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येते.

शासनाने दि.14 डिसेंबर, 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन घेऊन, व्यवस्थितरित्या भरुन ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी यापूर्वी ३० जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढवून दिली असून आता दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजीपर्यंत ऑफलाईन पध्दतीने सादर करता येतील.

साहसी क्रीडा पुरस्कारसह सर्व क्रीडा पुरस्कारासाठी कामगिरीचा कालावधी त्या पुरस्कार वर्षातील ३० जून रोजी संपणाऱ्या वर्षासह विचारात घेण्यात येईल.इच्छुक क्रीडा मार्गदर्शक. खेळाडू, दिव्यांग खेळाडू, साहिसी खेळाडू यांनी विहित मुदतीत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web