केंब्रिया इंटरनॅशल स्कूलच्या सायन्स कार्निवलला तुफान प्रतिसाद

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – स्टेम प्रोजेक्ट (stem project) , रोबोटिक्स (robotics), हायड्रोफोनिक्स (hydroponics), थ्री डी प्रिंटिंग (three D printing) ऑटोमेशन (automation) यासारख्या संकल्पना म्हणजे उद्याचे आपले भविष्य आहे. भविष्यातील या आणि अशाच प्रकारच्या विविध गोष्टींची पालक आणि मुलांना माहिती होण्यासाठी आयोजित केलेल्या जागतिक दर्जाच्या सायन्स कार्निवलला कल्याणकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेजने या सायन्स कार्निवलचे आयोजन केले होते.

हसत खेळत शिक्षणाद्वारे सायन्सची माहिती…
बऱ्याचदा सायन्स विषय म्हटलं की अनेकांना घाम फुटतो. मात्र मुलांना त्यांच्या कलेने आणि हसत खेळत एखादा विषय शिकवला की त्यातून आवड निर्माण होण्यास मोठी मदत होते. नेमका हाच धागा पकडून या सायन्स कार्निवलच्या माध्यमातून केंब्रिया इंटरनॅशनलने अत्यंत किचकट विषयांचे सोप्या पद्धतीने सादरीकरण केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पहिल्या इयत्तेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांपासून ते थेट बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात वेगवेगळे प्रयोगांचे सादरीकरण केले.

ज्यामधे मॅजिकल फ्लाईंग बॉल, इनव्हिजीबल इंक, वॉलकॅनो एक्सप्लोजन, सोलर दिवा, 3 डी प्रिंटिंग, इलेक्ट्रिक सायकल, रोबोटिक्स, हायड्रोफोनिक फार्मिंग, व्हर्चूअल रिॲलिटी, ऑटोनोमस कार, पोटेंशिओ मीटर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, ऑटो फूड डिस्पेन्सर यासह तब्बल 50 विविध प्रकार पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याची माहिती पोटे ग्रुपचे सीएमडी बिपिन पोटे यांनी दिली.

भविष्यातील तंत्रज्ञान काय आहे, भविष्यातील करिअर आणि करिअरचे पर्याय काय आहेत याची माहिती आपल्या इथल्या पालक आणि मुलांना होण्याच्या उद्देशाने हा सायन्स कार्निवल आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले. तर हा सायन्स कार्निवल यशस्वी करण्यासाठी केंब्रिया इंटरनॅशनलच्या संचालक मीनल पोटे, प्रिन्सिपल हिना फाळके यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web